Ratnagiri

? दंगल राजकारणाची..भास्कर जाधवांच्या ‘ राष्ट्रवादी ‘ वासी मुलाला ZP अध्यक्षपद कसं द्याव ? शिवसेनेला पडला प्रश्न..?

? दंगल राजकारणाची..भास्कर जाधवांच्या ‘ राष्ट्रवादी ‘ वासी मुलाला ZP अध्यक्षपद कसं द्याव ? शिवसेनेला प्रश्न

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतींची निवड दोन आठवड्यात होणार आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या चिरंजीवाचे नावही चर्चेत आहे. मात्र विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांना संधी कशी देता येईल, याविषयी शिवसेनेत खलबतं सुरु आहेत.
अध्यक्षांना मुदतवाढ नाहीच
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतींची निवड येत्या 22 मार्चला होणार आहे.
सव्वा सव्वा वर्षांसाठी शिवसेनेने ही सर्व पदं वाटून दिली होती. कोरोना काळात काम करण्याची संधी मिळाली नाही म्हणून सव्वा वर्ष पूर्ण झालेल्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून चर्चा सुरु होती. मात्र शिवसेनेच्या आदेशानुसार या सर्वांनी राजीनामा दिला होता.
पंचायत सभापतींची निवडही 16 मार्चला होणार आहे. रत्नागिरी, लांजा, खेड, राजापूर आणि खेड पंचायत समितीच्या सभापतींनीही राजीनामे दिले होते. सर्वांचे राजीनामे मंजूर झाले आहेत. त्यामुळे आता इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
ZP अध्यक्षपद कसं द्यावं?
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांचे नावही चर्चेत आहे. पण विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांना कशी संधी देता येईल, यावर सेनेत खलबतं सुरु आहेत.
भास्कर जाधवांच्या नाराजीची चर्चा
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर तसंच शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तेव्हापासून ते सेनेवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
मंत्रिपद न मिळाल्याने आपली नाराजी त्यांनी याअगोदर देखील बोलून दाखवली होती. राष्ट्रवादीत असताना त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळलेली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सेनापक्षप्रमुख आपल्याला मंत्रिपद देतील, अशी आशा त्यांना होती.
शिवसेना-राष्ट्रवादी-शिवसेना
भास्कर जाधव हे यापूर्वी शिवसेनेत होते. मात्र काही कारणांनी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीत असताना त्यांना महत्त्वाच्या खात्यांवर तसंच मंत्रिपदावर कामाची संधी मिळाली. तसंच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर देखील त्यांना काम करण्याची संधी शरद पवारांनी दिली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button