Dindori

? संतापजनक दिंडोरीत सावत्र आईकडून मतिमंद मुलांचा क्रूर छळ, गुप्तांगाला दिले चटके

? संतापजनक दिंडोरीत सावत्र आईकडून मतिमंद मुलांचा क्रूर छळ, गुप्तांगाला दिले चटके

सुनिल घुमरे दिंडोरी

दिंडोरी : माय मेली तरी मावशी जगावी अशी म्हण आहे पण आई व मावशी या दोन्ही नात्यांना काळिमा फासणारी घटना दिंडोरी तालुक्यातील पाडे या गावी घडली मूकबधिर मुलाला सावत्र आई असलेल्या मावशीने अंगावर चटके देत अमानुष अत्याचार केल्याची घटना व्हिडीओ व्हायरल झाल्याने उघडकीस आला आहे. सदर बालकावर नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली आहे.
याबाबतची माहिती अशी की पाडे येथील तीन वर्षीय मतिमंद बालकास त्याची सावत्र आईने अमानुषपणे मारहाण केली. अनेक गुप्तांग ओटीपोट पाय पाठ अशा विविध ठिकाणी चटके देत अत्याचार केले.ही घटना काही नागरिकांना समजताच त्यांनी त्यास दिंडोरी येथे उपचारासाठी नेले तेथे उपचार करून पुढे अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले .सदर सावत्र आई ही त्या बाळाची मावशी आहे.कौटुंबिक कलहातून सोडून गेलेल्या आईनंतर सावत्र आई ही मावशी असल्याने तिची माया मिळेल ही आशा फोल ठरत नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने संताप व्यक्त होत आहे दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली असून पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कलपेशकुमार चव्हाण करत आहे.

Leave a Reply

Back to top button