Mumbai

? मोठी बातमी..चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध ACB कडून गुन्हा दाखल

? मोठी बातमी..चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध ACB कडून गुन्हा दाखल

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, मला आणि माझ्या पतीला याबाबत कुठलीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मला माझी बाजू मांडण्याची संधी देखील दिली गेली नाही. हा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी मी तयार आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण❓

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरु होता. या प्रकरणात आता गुन्हा दाखल केला आहे. एसीबीकडून सांगण्यात आलं आहे की, अनेक दिवसांपासून तपास सुरु होता. त्यामुळं आता काही माहितीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे असलेल्या 90 टक्के मालमत्तेचा हिशोब नाही, असं एसीबीचं म्हणणं आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्यावा आणि हा तपास एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याला सोपवावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे. आमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे पुणे पोलिसांनी दिलेले नाहीत. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कुणाचा वाट पाहते आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे दोन फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये संजय राठोड आणि चित्रा वाघ यांचा मॉर्फ केलेला फोटो विकृतांकडून व्हायरल केला जातोय. मॉर्फ म्हणजे खोटा फोटो. तर दुसरा फोटो चित्रा वाघ आणि त्यांच्या पतीसोबतचा खरा फोटो आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील मॉर्फ केलेल्या फोटोंवर विश्वास ठेवू नका आणि तसे फोटो व्हायरल केल्यास तो सायबर गुन्हा समजला जातो. व्हायरल झालेले फोटो हे चित्रा वाघ यांनी स्वतः माध्यमांपर्यंत पोहोचवले आहेत. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी आणि समाजमाध्यमांवरील हे फोटो लवकरात लवकर हटवावे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. हा फोटो सर्वच समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button