Jalgaon

? Big Breaking…जळगाव वस्तीगृह महिला अत्याचार प्रकरणी विधानसभेत गदारोळ; चार सदस्यीय चौकशी समिती गठीत..!

? Big Breaking…जळगाव वस्तीगृह महिला अत्याचार प्रकरणी विधानसभेत गदारोळ; चार सदस्यीय चौकशी समिती गठीत.

मुंबई : जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. दरम्यान, याच घटनेचे पडसाद आज विधीमंडळात उमटल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.
तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावले गेले. त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या गंभीर प्रकाराबद्दल दोषींवर कारवाई झाली पाहिजे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की, या पोलिसांचे निलंबन करावे, अशी मागणी श्वेता महाले यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर नियमाने कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे.

जळगावमधील आशादीप वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे.
घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार आहे. त्यानंतर नियामानुसार दोषींवर कारवाई करू, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले.

श्वेता महाले यांनी मागणी केल्यावर गृहमंत्र्यांनी नोंद घेतो असे त्रोटक उत्तर दिले. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेत हे योग्य नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल, असा थेट इशारा दिला. आई बहिणी सुरक्षित नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर नवाब मलिक यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी देऊ नका हे वाक्य रेकॉर्डवरून काढा अशी मागणी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button