Shirpur

? बापरे…! शिरपूर तालुक्याला गुन्हेगारीची लागली किड, सुवर्ण नगरी म्हणता आता येते मात्र चिड

? बापरे…! शिरपूर तालुक्याला गुन्हेगारीची लागली किड, सुवर्ण नगरी म्हणता आता येते मात्र चिड

पंकज चव्हाण

शिरपूर तालुका पाहिला तसा सर्व दृष्टीने सुजलाम सुफलाम होता. तालुक्याची महती अनेक अनेक कारणांनी देशाच्या, राज्याच्या गौरवगाथेत होती. कोरोनापुर्वीचा काळ व कोरोना नंतरचा काळ शांततेत पार पडला. पण जशी जशी लोक बाहेर पडू लागली. तसतसा गुन्हेगारीचा अजगर तालुक्याला विळख्यात घेवू लागला. कुठे करोडोंचा भांग गांजा तर
कुठे लाखोंची दारू , कोरोडोचे भूखंड माफिया यांनी या तालुक्याला किड लावायला सुरुवात केली. शेती, पाणी, उत्पादन, शिक्षण या गोष्टीमुळे नाव लौकिक आलेला तालुका मात्र लाखो करोडोंची गोष्ट सहज कोणाच्या आशिर्वादाने घडते हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. कधीकाळी रेशन, राॅकेल, नकली दारू, वाळूने बदनाम झालेला तालुका काही कर्तव्यदक्ष अधिकार्यांन मुळे वठणीवर आला होता. पण गेल्या महिने दोन महिने पासून बिळात घुसलेले गुन्हेगारी उंदरे पुन्हा पोखरण्याचा मार्गावर लागलेत. थेट मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातचे सराईत गुन्हेगार आपले पाय पसरवताय. वेळीच यांचा नष्ट मनसुबे खात्मा करणे गरजेचे होवून बसले, कोरोना काळानंतर व्यापार व्यवसायाला जणू कोणाची दृष्टच लागली आहे. तालुक्यातील व्यापारी, कामगार, बेरोजगार हवालदिल झालेला आहे. बाहेरून येणारा गुन्हेगाराची गुन्हे करण्याची पद्धत लक्षात घेता, त्याचे तोंड ठेचणे गरजेचे झाले आहे.
या अनेक गंभीर प्रश्नावर मार्ग काढून बिमोड होईल अशी शिरपूर तालुक्याची जनता आस लावून बसली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button