Amalner

?️अमळनेर कट्टा… ही कसली संचारबंदी ही तर संचारसंधी…!अमळनेरात अजब गजब लॉक डाऊन..!दुकाने बंद..रस्त्यावर गर्दी बेधुंद..!प्रशासन कोमात..!

?️अमळनेर कट्टा… ही कसली संचारबंदी ही तर संचारसंधी…!अमळनेरात अजब गजब लॉक डाऊन..!दुकाने बंद..रस्त्यावर गर्दी बेधुंद..!प्रशासन कोमात..!

अमळनेर येथे कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे.राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपूर्ण पडत आहेत.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.वरील आदेशानुसार रात्रीचा कर्फ्यु आणि संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. पण अमळनेर नगरीत मात्र लॉक डावूनच्या पहिल्या दिवसा पासूनच नियम धाब्यावर बसवून अनेक दुकाने तर चोरून लपून सुरू आहेतच पण संचारबंदी नियमाचा कुठेही मागमूस आढळून येत नाही. कोणत्याही चौकात पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही. सुरुवातीला उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी थोड्या फार प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. परंतु आता तर चौका चौकात ठीक ठिकाणी लोक घोळक्याने उभे असतात,अनेकांनी मास्क लावलेले नसतात,एकाच दुचाकी वाहनावरून ट्रिपल सीट शिवाय रिक्षां मधून अधिक प्रवासी,रस्त्यांवर अधिक प्रमाणात वाहने,पेट्रोल पंपावरील गर्दी इ आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

सुरुवातीपासूनच ढिलाई ठेवल्याने प्रशासनाला न जुमानता लोक रस्त्यांवर मुक्त पणे फिरत आहेत.गलवाडे रस्त्यावरील मुंबई चौपाटीचे आईस क्रिम दुकान बिनदिक्कतपणे सुरू आहे तर धुळे रस्त्यावरील प्रवेशद्वाराजवळ देखील याच आईस क्रिम वाल्यांची एक गाडी दिवसरात्र सुरू आहे. बाजारपेठे पुरताच बॅरिगेट्स बांधून आणि याच भागातील दुकाने बंद करून कोरोना वर नियंत्रण अमळनेर प्रशासन मिळविणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ढेकू रोड, पिंपळे रोड धुळे रोड, कुंटे रोड, गलवाडे रोड, स्टेशन रोड येथील अनेक दुकाने नियमांचे उल्लंघन करत सुरू आहेत.पण याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे की त्यांना ही माहिती मिळत नाही.शहरात कुणाचा धाक राहिला नसून लॉक डाऊन केवळ नावालाच असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. सध्या हे काम माझं नाही तो विभाग करेल,ही जबाबदारी माझी नाही,असा चालढकल पणा सुरू असल्याचा अनुभव देखील येत आहे. त्यामुळे हा लॉक डाऊन,संचारबंदी केवळ खरेदी करणाऱ्यांसाठी असून इतरांना रान मोकळं आहे अशी देखील चर्चा गावात सुरू आहे.. एकूणच प्रशासन कोमात असून कोरोना आणि जनता जोमात आहे..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button