Amalner

?️अमळनेर कट्टा..गलवाडे रस्त्यावर विमल-गुटखाच्या गाडीवर छापा.. .18 लाख 56 हजारांचा माल जप्त…

?️अमळनेर कट्टा..गलवाडे रस्त्यावर विमल-गुटखा ची रेड..18 लाख 56 हजारांचा माल जप्त…

अमळनेर आज दुपारी 12.40 वाजता गलवाडे रस्त्यावर गुटखा विमल घेऊन जाणाऱ्या गाडी वर धाड टाकत जवळ जवळ 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात विमल,गुटखा व्ही वन तंबाखू घेऊन टाटा मॅक्स नंबर एमएच 18 बीजी 3738 नं ची गाडी स्थानिक गुन्हे शाखेचे दिपक शिंदे जळगांव यांनी पकडली.अरूण शंकर पाटील वय 58 चालक रा.लक्ष्मीकांत काॅलनी दोंडाईचा गोविंद अमरलाल राजानी रा.सिंदखेडा धुळे यांच्या मालकीची सदर गाडी असून मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा भादवी 328,188,272,273 दाखल करण्यात आला आहे.

मुद्देमालात

मोठी गोण्या 20
एकुण 4,84,000/-

लहान गोण्या 60
एकुण 13,72,800/-

एकुण 18,56,800/-

वाहन
7,00,000/-
मा. राकेश जाधव उपविपोअ. अमळनेर व राहुल फुला सपोनि मारवड यांचे मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली. तपास पोउनि पेठकर वैभव पोना 833 निकम व पोना 2355 चव्हाण हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button