Amalner

?️अमळनेर कट्टा..अमळनेर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मुद्देमलासह जप्त..!महसूल विभागाची धडक कार्यवाही..!

?️अमळनेर कट्टा..अमळनेर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मुद्देमलासह जप्त..!महसूल विभागाची धडक कार्यवाही..!
अमळनेर येथील मौजे रणाईचे बुद्रुक येथे अवैधरित्या वाळू उपसा केला जात असल्याची तक्रार गावकऱ्यांनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या कडे केली होती. या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार वाघ यांनीआज संध्याकाळी 6 वाजता आपल्या पथकास रणाईचे येथे रवाना केले. येथे गौणखनिज अवैधरीत्या वाहतूक करताना ट्रॅक्टर आढळून आले.सदर मुद्देमलासह ट्रॅक्टर तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा केले पथकामध्ये तलाठी जीआर महाजन, वाय आर पाटील, विकास परदेशी, प्रकाश महाजन ,महिंद्रा पाटील ,तिलेश पवार आणि संदीप शिंदे यांनी कार्यवाही केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button