Amalner

?️अमळनेर कट्टा…उद्या पासून 14 तारखेपर्यंत ही असेल व्यवसायासाठी नवी वेळ

?️अमळनेर कट्टा…उद्या पासून 14 तारखेपर्यंत ही असेल व्यवसायासाठी नवी वेळजळगांव जिल्ह्यात तीन दिवस व्यवसायासाठी १ तास वाढवला
अमळनेर- जळगांव जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अक्षय तृतीया व रमजान ईद निमित्त बाजारात किराणा अत्यावश्यक वस्तु खरेदी करतांना नागरिकांच्या सोई साठी म्हणून १२ मे ते १४ मे २०२१ पर्यंत किराणा दुकाने सुरु करण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यन्त वाढवून दिली आहे.असे आहेत आदेश…
1) दिनांक 12 मे, 2021 ते दिनांक 14 मे, 2021 या कालावधीत सकाळी 07.00 ते सकाळी 12.00 वाजेपावता किराणा दुकाने, ड्रायफुट्स दुकाने, भाजीपाला, फळविक्री, अंडी /चिकन / मटन / मासे विक्रीची दुकाने, बेकरी, दुध विक्री केंद्रे सुरु राहतील.
2) सदर सणानिमित्त एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता नागरिकांनी आपल्या प्रभागातील / वार्डातील दुकानातून खरेदी करावे. शक्यतो होम डिलिव्हरीस प्राधान्य देण्यात यावे व खरेदीसाठी जातांना नागरिकांनी शक्यतो वाहनाचा वापर टाळावा.
3) दुकान मालक / चालक यांनी दुकानामध्ये एका वेळेस 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देऊ नये, तसेच दुकानासमोर गर्दी होऊ नये याकरीता दुकानासमोर वर्तुळ तयार करुन नागरिकांना सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याबाबत सूचित करावे.
4) वरील बाबींसाठी देण्यात आलेल्या सुट मध्ये दुकानदार व नागरिक यांनी कोविड-19 नियमावत्नींचे पालन करावे. तसेच नियमांचे उल्लंघन करणा-या आस्थापना, नागरिक यांचेवर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस
विभाग यांनी संयुक्तरित्या कारवाई करावी.
5) वरील बाबी व्यतिरीक्त उपोद्घातात नमूद दिनांक 22 एप्रिल, 2021 व दिनांक 30 एप्रिल, 2021 अन्वये लागू करण्यात आलेले निबंध कायम राहतील,
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाय ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.याकाळात दुकानांवर गर्दी करू नये ,सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सूचना दिली आहे, मास्क लावूनच बाजारात येणे,आवश्यक असल्यावरच बाजारात या,एका दुकानात ५ पेक्षा जास्त जणांना उपस्थित राहता येणार नाही. दक्षता घेणे आपल्या हिताचे असून नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
?️अमळनेर कट्टा...उद्या पासून 14 तारखेपर्यंत ही असेल व्यवसायासाठी नवी वेळ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button