Amalner

?️अमळनेर कट्टा..पांझरा नदीवरील बंधाऱ्यावरून लोखंडी पाट्यांची चोरी…!मारवड पोलिसांत गुन्हा दाखल..!

?️अमळनेर कट्टा..पांझरा नदीवरील बंधाऱ्यावरून लोखंडी पाट्यांची चोरी…!मारवड पोलिसांत गुन्हा दाखल..!

अमळनेर तालुक्यातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून आता चोरांना नदीवरील लोखंड ही अपूर्ण पडू लागले आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे
पांझरा नदीवर असलेल्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्यावर लोखंडी पाट्या आहेत.यापैकी ७५ लोखंडी पाट्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की गुरुवारी २४ रोजी सकाळी सरपंच काशीनाथ दगा माळी हे पाट्या काढण्यासाठी बंधाऱ्यावर गेले असता त्यांना तेथून ७५ पाट्या चोरीस गेलेल्या आढळून आल्या.त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती कळविली. चोरून नेलेल्या पाट्यांची किंमत १ लाख ६८ हजार रुपये आहे.एका पाटीची किंमत 2250 रु एव्हढी आहे.अश्या एकूण 75 पाटया चोरीस गेल्या आहेत. मांडळ येथे कोल्हापूर टाईप बंधाऱ्याची दुरूस्ती धुळे पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आली होती आणि २४० पाट्या टाकण्यात आल्या होत्या.सदर बंधाऱ्याच्या देखभालीची जबाबदारी मुडी ग्रामपंचायतीला देण्यात आली होती.

एकूण १ लाख ६८ हजार रुपयांच्या ७५ पाट्या अज्ञात चोरट्यांविरोधात मारवाड पोलीस स्टेशनला गुन्हा द दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button