Amalner

?️ अमळनेर कट्टा… कुलगुरूंच्या राजीनाम्याने प्रश्न मात्र अनुत्तरीत, राजीनामा देऊन पळ काढू नये कुलगुरूंनी खुलासा करावा विद्यापीठ विकास आघाडी तीव्र आंदोलन करणार..

?️ अमळनेर कट्टा… कुलगुरूंच्या राजीनाम्याने प्रश्न मात्र अनुत्तरीत, राजीनामा देऊन पळ काढू नये कुलगुरूंनी खुलासा करावा विद्यापीठ विकास आघाडी तीव्र आंदोलन करणार..

अमळनेर : कवियत्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी पी पाटिल यानी तडकाफडकी राजिनामा दिला वृत्तपत्राच्या माध्यमातून कळाले.
भगवान के घर देर है अंधेर नही या उक्तीप्रमाणे अन्यायाविरिद्ध आवाज उठवल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ विकास आघाडी चे अँड कुणाल पवार(राष्ट्रवादी महानगर सचीव जळगाव),जेष्ट नेते विष्णू भंगाळे(माजी महापौर तथा नगरसेवक व सिनेट सदस्य उमवी), ,देवेंद्र मराठे(NSUI जिल्हाध्यक्ष जळगाव), भुषण भदाने (फ़ार्मेसी स्टूडेंट कौन्सिल अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस),अतुल कदमबांडे (माजी सिनेट सदस्य उमवी),पियुष नरेंद्र पाटिल(सामजिक कार्यकर्ता) यांनी कुलगुरूंवर विविध प्रश्नाची सरबत्ती केली होती.तसेच कुलगुरु महोदयानी स्वताच आत्मपरीक्षण उशिरा का असेना पन केले असे वाटते, तसेच विद्यापिठातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला होता .
खालील काही मुद्दे त्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत ठरले।
(1) प्रा भटकर प्रेम प्रकरण त्याची दोन वर्ष चौकशी झाली नाही,आता सबधितांवर गुन्हा दखल होणार होता.
(2)तसेच काही खोटे ठराव विद्यापिठात करुन घेतले त्या चौकशी ला त्यांना सामोरे जावे लागनार होते.
(3)तसेच संशोधन चौर्य असलेले प्र कुलगुरु यांचा राजिनामा का घेतला नाही?
(4)ESI daily wages लिउ वेजेस संशोधन चोरी असलेले प्राध्यापक त्याना दिलेली बढती.
(5)संशोधन चोरी असलेल्या प्राध्यपकाना दिलेली बढती
(6)lockdown मध्ये एका महाविद्यालयात मुलाखत घेतली एका महाविद्यालयात नाकारली.
(7)एका महाविदयाल मधे सतरा लोकाना तक्रारी असल्यावर नियुक्ती आदेश व त्याठिकाणी एका महिलेस आदेश दिलेले नही ह्याच पण समर्पक उत्तर त्यानी दिले पाहिजे.
(8)तसेच विद्यापीठा मध्ये सुरक्षा सेवेच्या ठेकेदारास कामगार कायदा येवजी गार्ड बोर्ड कायदा लागू करण्यासंधर्भात दिपक बंडू पाटिल व्यवस्थापन परिषद सदस्य यांची एकसदयसिय समिती कुलगुरु नी केली होती ती एक सदस्य च का केली असा सवालही केला होता.
(9)नाशिक कामगार उपायुक्त यांच्या कडे तक्रारी नुसार सुनावणी झाली त्यावेळी काय झाले हे देखील जाहिर करावे त्यावेळेस कायदा अधिकारी व प्र कुलसचिव हजर होते त्यानी देखील आरोप खोटे असतील तर खंडन करावे.
असे बरेच प्रश्न यांची उत्तर द्यावी लागतील ना त्यापेक्षा राजिनामा दिलेला बरा म्हणुन त्यानी राजिनामा दिला असे वाटते.
प्र. कुलगुरू यांनी देखील स्वतःचे आत्मपरीक्षण करावे,असे नमूद केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button