Amalner

?️अमळनेर कट्टा..महसुलचा वाळू माफियांवर सतत कार्यवाहीचा बडगा…!आता लागला मोठा मासा गळाला..!

?️अमळनेर कट्टा..महसुलचा वाळू माफियांवर सतत कार्यवाहीचा बडगा…!आता लागला मोठा मासा गळाला..!
आज सकाळी 5 .30 वाजता अमळनेर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आर के नगर जवळ मुद्देमलासह पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. हे ट्रॅकटर अमळनेर शहरातील सर्वात मोठा वाळू माफियाचे असून 3 ट्रॅक्टर एक डंपरच्या माध्यमातून सतत अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात होती.पथकात एस एस महाजन पिंगळवाडे,अमोल सोनवणे गांधली,आर के पाटील जळोद,विकास परदेशी जैतपिर,वाल्मिक पाटील दोधवद इ तलाठी चा समावेश होता.
सदरील ट्रॅक्टर चे मालक आबा भोई यांच्या वर तीन चार वर्षापासून कारवाई होत नव्हती.याची कारणे काय होती ते गुलदस्त्यात च बरे आहे..पण ठोस प्रहार ने वारंवार मोठ्या वाळू माफियांवर कार्यवाही संदर्भात बातमी प्रकाशित देखील केली होती. आजही सकाळी हे ट्रॅकटर तोडी होऊन सुटण्याच्या मार्गावर होते पण किल्ल्या फिरल्या आणि दबावात ट्रॅकटर तहसील कार्यालयात जमा करणे भाग पडले आहे. अजूनही काही मोठे मासे आहेत की ज्यांना प्रशासन हात लावत नाही.मोठ्या वाळू माफियांवर कार्यवाही करण्यास प्रशासन घाबरते की त्यांच्या कडून पाहिजे ती रसद पुरवली जाते असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो.
सध्या तरी महसूल विभाग वाळू माफियांच्या मागे जोरदारपणे लागले असून ह्या संपूर्ण महिन्यात ही 9 वी कार्यवाही आहे.पाहू या अजून किती मोठे मासे गळाला लागतात की सुटून जातात.
काही कॉन्टॅक्ट मुळे हा वाळू मधला सर्वात मोठा मासा हाती लागत नव्हता . तलाठी निघणे अगोदरच फोन येऊन जात असल्याने ह्या वाळू माफियावर तीन या चार वर्षापासून कार्यवाही होत नव्हती. अनेक ट्रॅक्टर वर कारवाई व्हायची पण ह्या ट्रॅक्टर वर काही कारवाई होत नव्हती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button