Amalner

?️अमळनेर कट्टा…तत्कालीन गटविकास अधिकारी बेकायदेशीर वाहन वापरल्या प्रकरणी कायदेशीर शिस्तभंगाची कार्यवाही करा..कमलाकर रणदिवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

?️अमळनेर कट्टा…तत्कालीन गटविकास अधिकारी बेकायदेशीर वाहन वापरल्या प्रकरणी कायदेशीर शिस्तभंगाची कार्यवाही करा..कमलाकर रणदिवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
अमळनेर येथील पंचायत समिती अमळनेर अंतर्गत शासकिय वाहनाचा बेकादेशीरीत्या वापर केल्याप्रकरणी श्री संदिप दिलीप वायाळ सहा.गट विकास अधिकारी अमळनेर यांचे विरुध्द तात्काळ कायदेशीर शिस्तभगांची प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिले आहेत. या बाबतीत सविस्तर माहिती अशी की राकेश सुरेश पाटील रा मंगरुळ ता अमळनेर जि जळगांव यांनी दि १७/०३/२०२१ रोजी पत्र दिले होते की
उपरोक्त विषयासंदर्भात आपल्या कार्यालयातील वाहन क्रमांक एम एच-१९ एम०४२१ महिन्द्रा कंपनीची जीप (वाहन) अमळनेर हे दि १६/०३/२०२१ रोजी श्री संदिप वायाळ सहाय्यक, गट विकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर हे बेकायदेशीररीत्या जळगांव जिल्हा सोडुन नाशिक व्हाया पालघर येथे सदर वाहन घेऊन गेले होते.याबाबतीत सविस्तर माहिती मिळण्याची देखील विनंती राकेश पाटील यांनी केली होती. या पत्रानुसार सदर वाहन बेकायदेशीररीत्या वापर केल्या प्रकरणी तात्काळ चौकशी करुन वरील कालावधीचे लॉकबुक,हिस्ट्रीबूक,डिझेलसाठानोदवही,वाहनचालकाची दैनंदिनी सत्यप्रत सादर करावी.असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणदिवे यांनी दिले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button