Amalner

?️अमळनेर कट्टा….पोलखोल..दगडी दरवाजा सिरीज..पार्ट-1 अमळनेरची शान ऐतिहासिक दगडी वेस ची पुरातन माती…कुठे गेली..?वाचा न प आणि पुरातन खात्याची लाखोंची मिलीभगत..!

?️अमळनेर कट्टा….पोलखोल..दगडी दरवाजा सिरीज..पार्ट..1अमळनेरची शान ऐतिहासिक दगडी वेस ची पुरातन माती…कुठे गेली..?वाचा न प आणि पुरातन खात्याची लाखोंची मिलीभगत..!

अमळनेर येथील ऐतिहासिक दगडी दरवाजाचीदयनीय अवस्था पुरातत्व विभाग आणि न प प्रशासनाने करून ठेवली आहे. हा दगडी दरवाजा स्वातंत्र्यपूर्वकालीन आहे. संपूर्ण दगडांनी बांधलेला हा दरवाजा अमळनेर शहराची सांकेतिक आणि ऐतिहासिक खुण आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दरवाजाची निगा राखल्यामुळे दरवाजाची मोठ्या प्रमाणात नासधूस होत झाली .या अनुषंगाने शेवटी समाजिक कार्यकर्ते आणि शहरातील सुजाण नागरिक यांच्या पाठपुराव्यामुळे सदर दरवाजाचे नवीन काम पुरातत्व खात्याने अमळनेर न प कडे सोपविले आहे.

दगडी दरवाजाचा पूर्वेकडील बुरुज २४ जुलै २०१९ रोजी पावसामुळे क्षतिग्रस्त झाला होता, त्यामुळे तात्पुरती गोण्यांची व्यवस्था करण्यात आली,परंतु भविष्यात हा क्षतीग्रस्त भाग पुन्हा कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक इतर रस्त्यावरून वळवण्यात आली होती.
या संरक्षित स्मारकाचे जतन दुरुस्ती कामाऐवजी स्मारकाचे महत्व जतन करून शहरातील वाहतुकीची कायम कोंडी सोडवण्यासाठी नगरपरिषद विकास योजनेनुसार वेस देखरेख व दुरुस्तीकरिता नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

अमळनेर नगरपरिषद यांनी २२ ऑक्टोबररोजी वेस (दगडी दरवाजा) दुरुस्ती व संवर्धनाच्या कामाचे आदेश ठेकेदार अमन कन्स्ट्रक्शन यांना रक्कम १ कोटी १२ लाख ९९ हजार २७३ रुपयेप्रमाणे ठेका आता दिला आहे.

आता प्रश्न असा उपस्थित झाला की सदर दगडी वेस रात्रीच्या वेळी जेसीबीच्या मदतीने बुरुज पाडण्याचे कार्य सुरू करून काम फारच वेगात सुरू झाले याचा देखावा निर्माण करण्यात आला होता.ही पडझड करताना मोठ्या प्रमाणात जुनी माती आणि जुना वारसा असलेले दगड देखील निघाले होते. ही सर्व ऐतिहासिक संपत्ती असून पुरातत्व खात्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सदर मातीचा स्वतः उपस्थित राहून पंचनामा करून सदर ऐतिहासिक वारसा असलेल्या माती, दगड किती जुने व कामात येणारे आहेत का ? मातीचा पोत.. जैविक उपयुक्तता, मृदा संधारण याची खातरजमा करूनच त्या सर्व ऐतिहासिक वारसा असलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याचे आदेश देणे आवश्यक होते. परंतु नियमानुसार प्रोसिजर न होता ही प्राचीन माती गायकवाड हायस्कुल च्या बाजूने जाणाऱ्या बोरी नदीच्या काठाला जाणाऱ्या रस्त्याच्या भरावासाठी वापरली गेल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.अशी जोरदार चर्चा गावात सुरू आहे. विशेष म्हणजे ह्याच भरावासाठी 40 ते 42 लाखांचे नवी निविदा काढून तो ही लक्ष्मी न प च्या ..लो प्र …मिसेस इंडिया ..?यांनी पदरात पाडून घेतली आहे. असेही बोलले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button