Amalner

?️अमळनेर कट्टा…ताडेपुरा भागात पोलिसांची सट्टा व जुगाराच्या अड्ड्यावर धाड..!

?️अमळनेर कट्टा…ताडेपुरा भागात पोलिसांची सट्टा व जुगाराच्या अड्ड्यावर धाड..!
अमळनेर येथील ताडेपुरा भागात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली असून साधारणपणे 8 हजारापर्यंत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बाबतीत सविस्तर माहिती अशी की मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक हिरे यांनी आपल्या पथकास कार्यवाहीसाठी पाठविले व सदर ठिकाणी कल्याण मटका खेळत असलेले जुगारी व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले आहेत.
आज दिनांक 03/05/2021 रोजी मा.पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर शहारात ताडेपुरा, कंजरवाडा भागात हनुमान मंदिराच्या आडोशाला रविंद्र पुंडलीक चौधरी नावाचा इसम त्यांचे कडेस कामास असलेला रमेश नथ्थु कंजर यांचे करवी त्याचे स्वताचे फायद्याकरीता कल्याण मटका नावाच्या सट्टा जुगाराचे अंक आकड्यावर लोकांकडुन पैसे स्विकारुन सट्टा जुगाराचा खेळ खेळत व खेळवित आहे अशी गुप्त बातमी नुसार वरील पोलीस स्टॉफ व पंच असे खाजगी वाहनाने जावुन वाहन दुरवर थांबवुन बातमीच्या ठिकाणी पायी पायी जावुन आडोश्यातुन बातमीची खात्री करता ताडेपुरा भागातील हनुमान मंदिराच्या मागे आडोशाला दोन इसम खाली बसुन काहीतरी लिहत असतानां दिसले व त्याचे जवळ काही इसम वाकुन सागंत असतानां दिसले म्हणुन आमची व पंचाची खात्री होताच त्याचेवर 17.45 वा. छापा टाकला असता आकडा लावणारे इसम तेथुन पळुन गेले त्यांचा पाठलाग रवींद्र पाटील, पोकॉ, 1124 भुषण बाविस्कर अशांनी केला परंतु ते मिळुन आले नाही. खाली बसलेले इसमांना इतर स्टाफ ने जागीच पकडले.
तेव्हा हेका, 1577 दिपक विसावे यांनी त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी अनुक्रमे 1) रमेश नथ्थु कंजर वय 50 वर्षे रा. ताडेपुरा, कंजरवाडा, अमळनेर 2) रविंद्र पुंडलीक चौधरी वय 46 वर्षे रा. तांबेपुरा, शिवशक्ती चौक, अमळनेर असे
सांगितले व अनुक्रम नं. 1 याने कळविले की, मी रविंद्र पुंडलीक चौधरी यांचे कडेस रोजंदारीने सट्ट्याचे आकडे घेण्याचे काम करतो. त्यांची अनुक्रमे अंगझडती घेता त्यांचेकडेस खालील प्रमाणे रोख रुपये व सट्टा जुगाराचे साधने
मिळुन आले ते 1) 4520 रुपये रोख रमेश नथ्थु कंजर रा. ताडेपुरा, कंजरवाडा, अमळनेर याचे अंगझडतीत मिळुन आलेले
2) 4240 रुपये रोख रविंद्र पुंडलीक चौधरी रा. तांबेपुरा, शिवशक्ती चौक, अमळनेर याचे अंगझडतीत मिळुन आलेले
3) 00.00 किंमतीचे सट्टा जुगाराच्या अंक, पैसे व दिनांक लिहिलेले सट्ट्याच्या आकड्याच्या पावत्या, दोन बॉलपेन व एक कार्बनपेपरचा तुकडा एकुण 8760/- रुपये रोख तसेच सट्टा जुगाराची साधने
तरी आज दि. 03.05.2021रोजी 17.45 वाजता अमळनेर शहरातील ताडेपुरा, कंजरवाडा भागातील हनुमान मंदिच्याच्या भिंतीच्या आडोशाला 1) रमेश नथ्थु कंजर वय 50 वर्षे रा. ताडेपुरा, कंजरवाडा, अमळनेर 2) रविंद्र पुंडलीक चौधरी वय 46 वर्षे रा. तांबेपुरा, शिवशक्ती चौक, अमळनेर हे त्यांचे स्वताचे फायद्याकरीता कल्याण मटका नावाच्या सट्टा जुगाराचे अंक आकड्यावर लोकाकडुन पैसे स्विकारुन सट्टा जुगाराचा खेळ खेळत व खेळवित रोख रुपये 8760/- व कल्याण मटका जुगाराची साधणांसह मिळुन आला म्हणून विरुध्द म. जु. का. कलम
12(अ) सह भादंवि कलम 109 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button