Amalner

?️अमळनेर कट्टा… जुनी पेन्शन तुमचा हक्कच….. डॉ.सुधीर तांबे

?️अमळनेर कट्टा… जुनी पेन्शन तुमचा हक्कच….. डॉ.सुधीर तांबे
अमळनेर : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन हा हक्कच आहे. व तो तुम्हाला मिळालाच पाहिजे, त्यासाठी मी शिक्षण मंत्री, अर्थमंत्री यांच्या बरोबर चर्चा करून जुनी पेन्शन प्रश्न मार्गी लावतो. असे आश्वासन नाशिक विभागाचे पदवीधर आमदार डॉ. सुधीरजी तांबे साहेब यांनी दिले.
दि. 10/05/ 2021 सोमवार रोजी ठीक 04:30 वाजता झूम ॲप वर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या व जुन्या पेन्शन पासून वंचित ठेवलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची डॉ. सुधीर तांबे साहेब यांच्या समवेत मिटींग झाली. त्यावेळी जुनी पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे, सर्वांचे GPF खाते असले पाहिजे अशा विविध समस्यांविषयी जुनी पेन्शन कोर कमिटीचे पदाधिकारी सुनील भोर सर, महेंद्र हिंगे सर, सचिन पगार सर, शांताराम कदम सर, संभाजी पाटील सर, दिगंबर नारायणे सर, संजय देसले सर, सुदाम दळवी सर, गिरासे सर, बाळासाहेब नेहे सर अशोक रसाळ सर ,इ. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मिटींगचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. संजय वाळे, आभार प्रा. दिलीप डोंगरे यांनी केले.
यावेळी सुनील दानवे सर, भाऊसाहेब शिंदे सर, प्रा. रामनाथ वर्पे, अर्जुन वाळके सर, बद्रीनाथ शिंदे सर, सोमवंशी अशोक सर, देविदास खेडकर सर, शिंदे कल्पना मॅडम, अजित वडावकर सर, ईश्वर महाजन सर, जालिंदर शेळके सर, दिनेश पाटील सर, संपत झावरे सर, सतीश सर, शर्मिला शिंदे मॅडम, मनोहर पाटील सर, नंदू बोऱ्हाडे सर, सरोदे सर ,पंकज पवार सर, प्रभुदास पाटील सर, प्रवीण पाटील सर,रहाणे सोमनाथ सर, राजेश सर, रमाकांत दरेकर सर, समाधान अहिरे सर, लांडगे देविदास सर, दिनेश डोरे सर, गणेश पाटील सर, जयंत पाटील सर, कैलास बाविस्कर सर, किरण पाटील सर, म्हसकर सर, भाऊसाहेब कोटकर सर, गुलाबराव फुंदे सर, दत्तात्रय जगताप सर, देवेंद्र केदार सर, देवकर सर, भुसारी सर, पाटील सर व नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव , अहमदनगर या ठिकाणाहून अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ऑनलाईन सभेमध्ये सहभागी झाले होते.
➖➖➖➖➖➖

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button