Amalner

?️अमळनेर कट्टा…प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे माझ्या वडिलांचा खून..!आता तरी न्याय द्या…!लोण बु येथील मयत छोटू अण्णा च्या मुलाने केला गंभीर आरोप..!

?️अमळनेर कट्टा…प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे माझ्या वडिलांचा खून..!आता तरी न्याय द्या…!लोण बु येथील मयत छोटू अण्णा च्या मुलाने केला गंभीर आरोप..!

अमळनेर येथील लोण बु येथे शेतात रवींद्र पाटील यांचा मृतदेह आढळून आल्या नंतर संपूर्ण दिवस प्रशासनास प्रेत उचलू न देण्याची भूमिका मयत रवींद्र पाटील उर्फ छोटू आण्णा यांच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी घेतली होती. आता सांयकाळी उशिरा पर्यंत सदर मृतदेह हा शेतातच होता.परंतु पंचनामे करून प्रशासनाने ठाम भूमिका व आश्वासन दिल्यानंतर मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.

या बाबतीत सविस्तर माहिती अशी की लोण बु येथे राहणारे रवींद्र पाटील हे सकाळी 4 वाजता शेतात गेले होते.त्यांनतर त्यांचा मुलगा मेघराज हा सकाळी 9 वाजता बैलांना पाणी देण्यासाठी म्हणून शेतात गेला असता त्याला वडील रवींद्र हे शेतात पडलेले आढळून आले. त्याने आरडाओरडा करून लोकांना गोळा केले. व पोलीस ठाण्यात कळविले.यानंतर घटना स्थळी पोलीस दाखल झाले पण हा घातपात आहे खून आहे.त्यामुळे आरोपींना आधी ताब्यात घ्यावे असा आग्रह मयताच्या कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी धरला.कारण ही भांडण पायवाटेने जाण्यावरून अनेक महिन्यापासून सुरू होती.या बाबतीत अमळनेर तहसीलदार यांच्या कडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच मेघराज यास मारहाण केली होती. तसेच सदर वहिवाटी संदर्भात न्याय मिळावा म्हणून अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. पण प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या तक्रारींची योग्य वेळी दखल न घेतल्याने आज माझे वडील रवींद्र पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. असा गंभीर आरोप मेघराज व त्याच्या आईने प्रशासनावर केला आहे. सदर घटनेला जबाबदार असलेले बंडू शिवाजी पाटील,चंदू बंडू पाटील व इतर असे असून त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी मयतचा मुलगा यांनी केली आहे. मयत रवींद्र यांचे वय अंदाजे 54 वर्षे असून त्यांच्या मागे पत्नी,मुलगा मेघराज व दोन मुली असा परिवार आहे.

या संदर्भात स पो नी राजेंद्र फुला यांनी चौकशी सुरू असून पोस्टमार्टेम झाल्यानंतर योग्य ते कारण कळेल असे सांगितले आहे. तर तहसीलदार यांनी सदर तक्रारी संदर्भात 19 तारीख त्यांना देण्यात आली होती. व जागेची व ठिकाणची तपासणी देखील करण्यात आली होती. व योग्य तो निर्णय चौकशी अंती दिला जाणार होता असे सांगितले आहे.

दरम्यान सदर मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. व पुढील कार्यवाही सुरू होती.त्याच बरोबर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू होती.पोस्टमार्टेम झाल्या नंतर अनेक गोष्टींचा खुलासा होईल.

?️अमळनेर कट्टा...प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे माझ्या वडिलांचा खून..!आता तरी न्याय द्या...!लोण बु येथील मयत छोटू अण्णा च्या मुलाने केला गंभीर आरोप..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button