Amalner

?️अमळनेर कट्टा…सावखेडा येथे महिलेचा विनयभंग.. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

?️अमळनेर कट्टा…सावखेडा येथे महिलेचा विनयभंग.. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

अमळनेर सावखेडा ता अमळनेर येथेव गल्लीत झोपलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास गल्लीत झोपलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार सदर महिलेने केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सावखेडा ता अमळनेर चार नंबर
गल्लीतील महिला बाहेर अंगणात झोपलेली असताना १३ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास विनोद चुडामन पाटील याने तिचा विनयभंग केला. या वेळी महिलेने
प्रसंगांवधना राखत त्याला लाथ मारून खाली पाडले. त्यावेळी तिचे पती, सासू यांनी उठून त्याला लाथा बुक्क्यांनी मारले असता तो पळून गेला. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात विनोद विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील रामदास पाटील करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button