Amalner

?️अमळनेर कट्टा..सट्टा जुगार अड्ड्यावर मारवड पोलिसांची धाड..!

?️अमळनेर कट्टा..सट्टा जुगार अड्ड्यावर मारवड पोलिसांची धाड..!

अमळनेर तालुक्यातील मारवड हद्दीतील खापरखेडा येथे बेकायदेशीर सुरू असलेल्या सट्टा जुगार अड्ड्यावर मारवड पोलिसांनी धाड टाकून मुद्देमालासह आरोपीस अटक केली आहे. याबाबतीत सविस्तर वृत्त असे की

आज दिनांक.२७/०२/२०२१ रोजी पोना/2020 सुनील तेली , सफौ/६५७ संतोष पवार, पोहेकॉ/१४० फिरोज बागवान असे मारवड पोलीस स्टेशनला हजर असतांना मा.सपोनिरी श्री.राहुल फुला यांनी दिलेल्या माहितीनुसार खापरखेडा गावी भिलाटी भागात जाणा-या रोडच्या बाजुस वस्तीजवळ सार्व जागी गजमल राजाराम भिल रा.खापरखेडा ता.अमळनेर हा स्वताचे फायद्यासाठी गैर कायदा परली मटका नावाचे सट्याचे अंक आकड्यावर लोकांकडुन आकडे व पैशाचे बिट स्विकारुन चरली मटका नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळत आहे व खेळवित आहे अशी आम्हास खात्रीशीर बातमी मिळाली आहे तरी बातमी प्रमाणे नमुद ठिकाणी जावून खात्री करुन
सट्टा जुगार कामी छापा घाला असे सांगितल्या नुसार वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी
खाजगी वाहनाने खापरखेडा गावी जावून वाहन रोडच्या बाजुला उभे करुन तेथुन पायी लांबुनच बातमीचे ठिकाणी जावून खात्री करता एक इसम खाली बसुन काहीतरी काहीतरी लिहीतांना दिसला व एक इसम त्याचे समोर उभा असलेला दिसला आमची व पंचाची खात्री झाल्याने सदर इसमावर
अचानक १७.३० वाजता छापा टाकला असता उभा असलेला इसमास आमची चाहुल लागताच तो पळुन गेला व बसलेल्या इसमास आम्ही जागीच पकडले. पंचासमक्ष त्यास त्याचे नाव गाव विचारले
असता त्यांने त्याचे नाव गजमल राजाराम भिल वय ३४ रा.खापरखेडा ता.अमळनेर असे सांगीतले आम्ही त्याची पंचासमक्ष अंग झडती घेता त्याचे कब्ज्यात खालील प्रमाणे कल्याण मटका सट्टा जुगार साधने व रोख रुपये मिळुन आला ते,
४७०/-रुपये रोख त्यात १००/- रुपये दराच्या चार नोटा, १०/- रुपये दराच्या सात नोटा,तसेच एक आकडे व पैसे लिहलेला कागद,कार्बनचा तुकडा जुना वापरता बॉलपेन असे सट्टा जुगाराचे साधने ४७०/येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा सट्टा जुगाराचे साधने व रोख रुपये आरोपी गजमल राजाराम भिल याचे ताच्यात मिळुन आल्याने सदर सट्टा जुगाराची साधने व रोख रुपये पंचासमक्ष
सविस्तर पंचनामा आम्ही स्वताहा जागीच जप्त करुन सदरचा जप्त माल जुगार गुन्ह्याकामी ताब्यात घेवून आरोपी मजकुर यास जुगार गुन्ह्याकामी ताब्यात घेतले आहे.
मारवड पोलीस ठाण्यात पोना/2020 सुनील तेली यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मु.जु.अॅक्ट कलम १२ (अ) प्रमाणे कायदेशिर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button