Amalner

?️अमळनेर कट्टा…. आधी सुविधा द्या मग कर भरू..!जेष्ठ नागरिक रामकृष्ण बागुल यांची उपोषणाद्वारे मागणी….!खाट टाकून बसले न प आवारात..!

?️अमळनेर कट्टा…. आधी सुविधा द्या मग कर भरू..!जेष्ठ नागरिक रामकृष्ण बागुल यांची उपोषणाद्वारे मागणी….!

अमळनेर येथील कोर्टाजवळील नविन ३८ लाखाची ड्रेनेज करुनही सांडपाण्याचा निचरा होत नाही. तसेच मे. कोर्टाचे व मे.न्यायाधिश साहेब यांचे निवासाचे सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने ड्रेनेज मध्ये पाणी साचून दुर्गंधी व डासांचा त्रास नागरीकांना होत असल्याबाबत….आज रामकृष्ण बागुल हे प्राणांतिक उपोषणास बसले होते.या संदर्भातील सविस्तर माहिती अशी की,रामकृष्ण बागुल हे श्रीकृष्ण कॉलनीत वास्तव्यास आहेत.ह्या परिसरातील गटार ही पूर्ण पणे तुंबलेली असते. तत्कालीन मुख्याधिकारी सी.विद्या गायकवाड यांनी दि.२४/१०/२०२० रोजी प्रत्येक्ष जागी येथून १ तास पाहणी केली होती. व संबंधीत श्रीकृष्ण कॉलनीचा ड्रेनेज डाळ पुर्व बाजुस काढून टाकणे बाबत संबंधीतांना सुचना दिल्या प्रमाणे काम कचेरी रस्त्या
पर्यंत झालेले असून कचेरी रोडचे बाजुस बिल्डर्स प्रशांत निकुंभ याने उत्तर दक्षिण बाजुस ड्रेनेजवर ढापे टाकल्यामुळे ड्रेनेजमध्ये गाळ साचला आहे. त्यामुळे ते काम न.पा.ने बंद ठेवले आहे. रामकृष्ण यांचे मेन गेट ते पश्चिम बाजुस हयुम पाईप पर्यंत ड्रेनेजचा ढाळ ३८ लाखाचे काम करीत असलेले ठेकेदार ठाकरे यांनी
व्यवस्थीत करुन दिलेले नाही. त्यामुळे ड्रेनेजमध्ये घाण पाणी साचून रहाते. तसेच उत्तर दक्षिण पाईप चेंबरची उभारणी करुन त्यावर ढापे ठेवलेले काम खराब कामामुळे तुटून गेलेले आहेत. शिवाय कोर्ट आवार व न्यायाधिश निवासाचे सांडपाण्यासाटी पुर्वीची ड्रेनेज बंद झाल्याने ड्रेनेजमध्ये घाण पाणी साचून
नागरीकांना दुर्गधी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.ठेकेदार यांना दि.२३/०३/२०१८ रोजी वर्क ऑर्डर देवून देखील त्यांनी १२ महिन्यात काम पुर्ण करावयास पाहिजे होते. अन्यथा त्यांना अटी व शर्ती प्रमाणे दर दिवसाला १००/- दंड करावा,पाहिजे होता. परंतु बांधकाम खात्यातील अधिकारी व ठेकेदार यांचे असलेले वैयक्तिक, आर्थिक संबंधामुळे ठेकेदारास कोणतीही नोटीस व दंडही केलेला नाही. यापुर्वी मा.आदरणीय न्यायाधिश साहेब, जिल्हा न्यायाधिश अमळनेर वर्ग १ यांचेकडील अधिक्षक साहेब यांनी दि.०१/१०/२०१९ रोजी न.पा.स पत्र देखील दिलेले आहे. ते पत्र व आरोग्य खात्याने बांधकाम खात्याकडे पाठविलेला रिपोर्ट बांधकाम खात्यातुन हेतुपुरस्कर गहाळ करण्यात आलेला आहे. करीता वरील प्रमाणे
न.पा.ने दि.२८/०२/२०२१ पर्यंत काम पुर्ण न करुन दिल्याने नागरीकांच्या हितास्तवआज ०१/०३/२०२१ पासून न.पा.कार्यालयाच्या आवारात प्राणांतीक उपोषणास बसणार बसले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button