Amalner

?️अमळनेर कट्टा…अक्षयतृतीया व रमजान ईद सणा निमित्त दुकाने सुरू ठेवा..जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी..

?️अमळनेर कट्टा…अक्षयतृतीया व रमजान ईद सणा निमित्त दुकाने सुरू ठेवा..जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी..
अमळनेर 14 मे 2021 रोजी अक्षयतृतीया व रमजान ईद हे दोन्ही पवित्र सण एकाच दिवशी येत असल्यामुळे नागरीकांना सणासाठी विविध वस्तू खरेदी करावयाच्या असतात. कोविड – 19 मुळे सद्य:स्थितीत फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश आहेत. शहरवासिय नागरीकांच्या मागणीनुसार अक्षयतृतीया व वर्षश्राध्द आणि रमजान ईद निमित्त कापड दुकान, पुजेचे साहित्य, सुकामेवा, पादत्राणेंसह आवश्यक असलेली दुकाने दिनांक 11 मे, 2021 ते 14 मे,2021 अखेर सकाळी 7 ते 11 या कालावधीत सुरु ठेवण्यात यावी अशी मागणी
जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा अमळनेर नगरपरिषद, अमळनेर यांनी पत्राद्वारे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button