Amalner

?️अमळनेर कट्टा..Breaking..अमळनेर च्या पोलीस ठाण्यात जयपाल हिरे यांची प्रभारी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती..! ही नियुक्ती देखील प्रभारी..!

?️अमळनेर कट्टा..अमळनेर च्या पोलीस ठाण्यात जयपाल हिरे यांची प्रभारी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती..! ही नियुक्ती देखील प्रभारी..!

अमळनेर येथील पोलिस ठाण्याच्या प्रभारी पदी पोलिस निरीक्षक जयपाल माणिकराव हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अंबादास मोरे यांची बदली झाल्यानंतर दिलीप भागवत यांची प्र पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा 2 महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर धरणगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची अमळनेर पोलीस ठाण्यात प्र पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती देखील प्रभारी असून कदाचित काही दिवसांनंतर अजून दुसरे पोलीस निरीक्षक येण्याचे संकेत आहेत.जयपाल हिरे यांची कारकीर्द अत्यन्त चांगली असून अमळनेर येथे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी त्यांची कारकीर्द कामी येईल असा विश्वास अमळनेर करांना वाटत आहे. परंतु नियुक्ती देखील प्रभारी असल्याने कमी कालावधीत कितपत योग्य कार्य पार पाडता येईल हे देखील एक आवाहन जयपाल हिरे यांच्या समोर असणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button