Amalner

?️अमळनेर कट्टा..अरे बापरे..!कोट्यावधी रुपयांचा अर्थसंकल्प देखील..थेट “राज भवना”तूनच सादर..!अमळनेर नगरपरिषदेत नगराध्यक्ष दालन आहे की नाही..?अर्थसंकल्प नेमका “सेट” कोणी केला..?

?️अमळनेर कट्टा..अरे बापरे..!अर्थसंकल्प देखील..थेट “राज भवना”तूनच सादर..!अमळनेर नगरपरिषदेत नगराध्यक्ष दालन आहे की नाही..?

अमळनेर नगरपरिषदेचा वार्षिक अर्थसंकल्प मा नगराध्यक्षा यांनी सादर केला.हा अर्थसंकल्प देखील थेट राज भवनातूनच सादर करण्यात आला. कर्मचारी आणि अधिकारी देखील राज भवनातच..!

हातात फक्त पेन धरून नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचा फोटो व्हायरल..!नुसतीच शो बाजी..!

बातमीत मात्र अमळनेर नगरपरिषद…? फोटो मात्र राज भवनाचा…?

अर्थसंकल्प नेमका कोणी सेट केला..?

नेमकी कुठे झाली ऑनलाइन सभा..? झालेल्या विशेष ऑनलाईन सभेत कोणतीही करवाढ करण्यात आली नाही.
हा अर्थसंकल्प 135 कोटी रुपयांचा असून 5 व्या अर्थसंकल्पास मंजुरी प्रदान करण्यात येवुन 2 कोटी 44 लाख रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली.
यावेळी 2020-21 चे सुधारित अंदाजपत्रक व सन 2021-22 चे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

अमळनेर नगरपरिषद अर्थसंकल्पाची ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या सभेचे
पिठासन अधिकारी म्हणून जिजामाता कृषिभुषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा यांनी कामकाजास राजभवन येथून सुरुवात केली.त्या नगरपरिषदेत जाऊ शकत नाहीत..!

मा मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांचे ऑनलाइन उपस्थितीत लेखापाल श्री.चेतन गडकर यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. सदर अर्थसंकल्पात महसुली जमा रक्कम रुपये 54 कोटी 12 लाख, महसुली खर्च रक्कम रुपये 54 कोटी 12 लाख, भांडवली जमा
रक्कम रुपये 80 कोटी 87 लाख, भांडवली खर्च रक्कम रुपये 78 कोटी 43 लाख सह रक्कम रुपये 2 कोटी 44 लाख शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button