Amalner

?️अमळनेर कट्टा…आपण “यांना”पाहिलंत का..?कोण आहेत “ह्या”..?हातामा”पुष्प”..कारभारी..!..ना..हातमा “घडाय”..!

?️अमळनेर कट्टा…आपण “यांना”पाहिलंत का..?कोण आहेत ह्या..?व्हॉट इज थिस..?

अमळनेर येथील लोक नियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील ह्या नाम मात्र नगराध्यक्ष पदावर विराजमान आहेत.त्या लोक नियुक्त नगराध्यक्षा असून लोकां पर्यंत पोहचणे त्यांच्या समस्या जाणून घेणे,त्यांचे निराकरण करणे,रोज नगरपरिषदेच्या कामकाजाच्या वेळेत कोणत्या तरी ठराविक वेळेत नगरपरिषदेत उपस्थित राहून लोकांच्या,जनतेच्या समस्या जाणून घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. पण अमळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून कार्यरत असलेल्या ह्या ताईंचा सर्व कारभार त्यांचे पतीराज दादा साहेब हेच बघतात.एव्हढच नव्हे तर सर्व कारभार राज भवन येथून चालतो..! यावर कडी म्हणजे नगराध्यक्षा ताई ह्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत तर त्यांचे पती हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात घालून फिरतात..! अरे काय लावलं आहे हे..!व्हॉट इज थिस…? हं..! असं कधी असतंय होय..! हेच जर दुसऱ्या राजकीय नेत्यांनी केले असते तर दादांनी आता पर्यंत कागद फिरवून फिरवुन..कायदे दाखवून दाखवून समोरच्याला माय च्यान येड केलं असतं ना बाबा..!अशी जोरदार चर्चा गावात सुरू आहे.

तर विषय गंभीर आहे..!अमळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ताई ह्या नगरपरिषदेत तर उपस्थित नसतातच पण त्यांना नेमकं काय चाललंय ह्याची पण खबर बात नसते..!फक्त सही करतात त्या…! वाचतात की नाही कोण जाणे..!आता एव्हढी मोठी जबाबदारी अमळनेर शहरातील नागरिकांनी अत्यन्त विश्वासाने ह्या ताईंवर सोपविली पण जबाबदारीची जाणीव तर नाहीच उलट लोकांना नगरपरिषदेऐवजी राज भवन वर भेटायला बोलवतात..! का जायचं नागरिकांनी तिथे..! त्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात का येऊ नये..?दबक्या आवाजात लोकं बोलतातच.. ना..!

आमच्या नगराध्यक्षा फक्त मोठ्या लोकांच्या कार्यक्रमात दिसतात तेंव्हा आम्ही त्यांना पाहून घेतो..!आणि नमस्कार करून घेतो..!अशी प्रतिक्रिया देखील एका जाणकार नागरिकाने दिली आहे. विशेष म्हणजे त्यांना अश्या कार्यक्रमात कोरोना चे भय नसते पण काम करायचं म्हटलं की त्यांना गुडघ्यांचा त्रास होतो, कोरोनाचे भय वाटते..! अशी ही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आधुनिक काळात संपूर्ण जग वेगाने प्रगती करत असताना एका कायद्याचे सर्व ज्ञान असणाऱ्या व्यक्तींनी असे वागावे म्हणजे दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण असा विषय आहे. कागद आला चला सही करा..ताई..!वाचता येत असेल तर नक्की वाचा..!बाकी काही गरज नाही मग वाचायची..!

जनतेने जो विश्वास दाखवला होता त्याचा पार विश्वासघातच केला जणू..!याच उत्तर कदाचित भविष्यात जनता नक्की देईल यात काही शंका नाही..!जनता जनार्दन आहे ती..!योग्य वेळी योग्य जागा दाखवूनच देते..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button