Amalner

?️अमळनेर कट्टा..अमळनेरातील गलिच्छ राजकारणाला कंटाळून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी केली बदली ची मागणी..!

?️अमळनेर कट्टा..अमळनेरातील गलिच्छ राजकारणाला कंटाळून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी केली बदली ची मागणी..!

अति-तात्काळ विनंती बदली होणे बाबतची मागणी मा संचालक नगरपरिषद संचनालाय मुंबई यांच्या कडे संदिप देवाजी गायकवाड, उपमुख्याधिकारी, तय कर निर्धारण व प्रशसकीय अधिकारी, श्रेणी – अ नगरपरिषद अमळनेर यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की संदीप गायकवाड हे कर निर्धारण व प्रशासकीय
अधिकारी श्रेणी – अ या पदावर दिनांक २१ जानेवारी २०१९ पासून नगरपरिषद अमळनेर कार्यालयात कार्यरत आहेत.नुकतेच अमळनेर तालुक्यात बॅनर प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले असून ह्या सर्व घटना अत्यन्त नाट्यमय रीतीने घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत त्यांना नगरपरिषद अमळनेर येथे सेवा बजवितांना मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यांनी म्हटले आहे की सेवा काळात मला नेमून दिलेल्या प्रत्येक विभागात काम करत असतांना राजकीय, सामाजिक व प्रशासनिक बार्बीना सामोरे जावे लागत आहे. व हे आपणास अनेक माध्यमातून कळाले असेलच. त्या बाबींना लक्षात घेता आपण सहानूभूती दर्शवावी. या गोष्टी पाहता अमळनेर येथील परिस्थिती माझ्यासाठी अनुकूल नाही. या कारणे मला मानसिक त्रास होत असून या त्रासामुळे माझे मनाचे संतुलन बिघडत आहे. व त्यामुळे कार्यालयीन कामकाजात अश्वस्थता निर्माण झालेली आहे.
वरील बाबीं संदर्भात मी कोणालाही दोष देत नसून माझे कार्य करणेच्या पध्दतीशी निगडीत आहे. तरी महाशयांनी या गोष्टीचा सहानूभूतीपूर्वक विचार करुन मला उचित ठिकाणी तात्काळ बदली करणेस विनंती आहे. सबब शहादा नगरपरिषद, चोपड़ा नगरपरिषद, कोपरगाव नगरपरिषद, शिरपूर नगरपरिषद इत्यादी ठिकाणी किंवा आपणास योग्य वाटेल त्याठिकाणी बदली दिल्यास देखील मी सदर
ठिकाणीचे बदली आदेश स्विकारणेस तयार आहे.असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले असून पत्राच्या प्रति विभागीय आयुक्त नाशिक,जिल्हाधिकारी, जळगांव,जिल्हा प्रशासन अधिकारी जळगांव, नगराध्यक्ष अमळनेर, मुख्याधिकारी अमळनेर यांना महितीसत्व रवाना केल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button