Amalner

?️ अमळनेर कट्टा… कोरोनाने मृत तीन कृषी कर्मचाऱ्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली मदत…

?️ अमळनेर कट्टा… कोरोनाने मृत तीन कृषी कर्मचाऱ्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली मदत…

अमळनेर : अमळनेर कृषी उपविभागातीत तीन सहकाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १ लाख ७० हजार ९०० रुपयांचा गोळा केलेला निधी तिन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून देण्यात आला.
कोरोनाच्या महामारीने अमळनेर कृषी उपविभागातीत तीन कर्मचाऱ्यांचे निधन झाले. या कुटुंबियांचे आर्थिक दुख हलके करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मदत निधी गोळा केला. त्यात अमळनेर कृषी उपविभागाने १४३०० रुपये, एरंडोल तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने २३२०० रुपये, अमळनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने ४१२०० रुपये, पारोळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने ४३००० रुपये, चोपडा तालुका कार्यालयाने ४३००० रुपये आणि धरणगाव तालुका कार्यालयाने ८००० रुपये असा १ लाख ७० हजार ९०० रुपयांचा निधी गोळा केला. हा जमा झालेला मदत निधीचे तीन समान भाग करून प्रत्येकी ५७०००/- रुपये दुर्दैवाने मृत्यू मुखी पडलेल्या आपल्या सहकारी कृषी सहाय्यक आर. आर. निकम, पि. टी. अहिरे, लिपिक किरण झिंगा कन्हैये यांच्या कुटुंबीयांना जाधवर साहेब तसेच एस. एस. बोरसे साहेब, भरत वारे साहेब, देसाईसाहेब , साळुंखे, किरण देसले, आर. आर. चौधरी, आर. एम. पाटील, बी. के. बोरसे, डी. एम. बोरसे , गणेश पाटील व कर्मचारी यांच्या उपस्थितीत निधी देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button