Amalner

?️अमळनेर कट्टा..अमळनेरकरांनो कोरोना फक्त बाजारात होतो हं…!बाकी बँका,कृ उ बाजार समिती,शासकीय कार्यालये येथे गर्दी झाली तर चालते..!प्रशासन रुपी सरड्याची धाव फक्त बाजारापूरताच….!

?️अमळनेर कट्टा..अमळनेरकरांनो कोरोना फक्त बाजारात होतो हं…!बाकी बँका,कृ उ बाजार समिती,शासकीय कार्यालये येथे गर्दी झाली तर चालते..!अमळनेर येथे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तसेच जिल्हाधिकारी आदेशानुसार लॉक डाऊन सुरू आहे. हे लॉक डाऊन आहे की मजा हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अनेक आस्थापना सुरू असून सराफ बाजारातील अनेक अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने बिनधास्त पणे सुरू आहेत.पण अमळनेर प्रशासनाने एकच भाग टार्गेट वर घेतला असून शहरातील इतर ठिकाणी नियमांचे उल्लंघन करत अनेक ठिकाणी गर्दी होत आहे. ह्या ठिकाणांवर प्रशासन आजपर्यंत पोहचले नाही.अमळनेर शहरात अनेक बँका आहेत सर्व बँका मध्ये तुफान गर्दी असून बँका ग्राहकांची कोणतीही काळजी घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. बँक ऑफ बडोदा,बँक ऑफ महाराष्ट्र, जनता बँक,देना बँक इ बँका मध्ये गर्दीचा उच्चांक गाठला असून ह्या सर्व बँका मध्ये गर्दी आटोक्यात आणण्यासाठी कोणतेही नियोजन नाही.तसेच ऑक्सिमिटर,थर्मल गन इ उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व बँक मॅनेजर शी बोलून वरील सुविधा का नाहीत,गर्दी आटोक्यात का आणली जात नाही असे प्रश्न उपस्थित केले असता उत्तरे समाधानकारक मिळाले नाहीत.प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे.कर्मचारी फक्त बाजारपेठ पुरताच कार्यवाही करत असून इतर ठिकाणी डोळे झाक केली जात आहे.बँका बरोबरच कृषी उत्पन्न बाजार समितीत रोजच तुफान गर्दी असून येथे राजकीय लोकांची चलती असल्याने प्रशासन कोणतीच कार्यवाही करत नसल्याचे दिसून आले आहे. कोव्हीड 19 च्या सर्व नियमांचे उल्लंघन कृषी उत्पन्न बाजार समितीत संपूर्ण कोरोना काळात सातत्याने झाले आहे. परंतु राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला अमळनेर प्रशासन बळी पडत असून अमळनेर प्रशासनाची हिम्मतच नाही इथे कार्यवाही करण्याची..हा मात्र गरीब सामान्य लोकांवर मात्र प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी मात्र दादागिरी दाखवत आहेत.नागरिकांमध्ये नाराजी असून लोकांनी प्रशासनाच्या विरुद्ध चीड निर्माण झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button