Amalner

?️अमळनेर कट्टा…अमळनेर महसूल ची धडाकेबाज कार्यवाही…आज एका वेगळ्याच ठिकाणाहून दोन ट्रॅकटर मुद्देमलासह जप्त..!

?️अमळनेर कट्टा…अमळनेर महसूल ची धडाकेबाज कार्यवाही…आज एका वेगळ्याच ठिकाणाहून दोन ट्रॅकटर मुद्देमलासह जप्त..!

मौजे अमळनेर येथे गजानन महाराज मंदिर च्या मागे मुंदडा नगर कडून हिंगोणे नदी ला लागतो .येथे अवैधरीत्या गौण खनिज वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर तहसील कार्यालयात मुद्देमालासह जमा केले असे.हा रस्ता आताच वाळू माफियांनी शोधून काढला असून हा रस्ता थेट काना कोपऱ्यातून हिंगोणे येथे जातो.तसेच ही वाट देखील पादचारी असून एका वेळी एकच वाहन जेमतेम जाऊ शकते. अश्या बिकट वाटेवर देखील अमळनेर महसूल विभागाने कार्यवाही करत वाळू माफियांचे मनसुबे धुळीस मिळवले आहेत.निश्चितच कोरोनाच्या अत्यंत बिकट परिस्थितीत अहोरात्र अनेक कामे सांभाळून देखील तहसीलदार मिलिंदकुमार वाघ आणि त्यांची टीम ही वाळू माफियांवर कार्यवाही करत आहेत याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या आदेशानुसार पथक तलाठी मंडळ श्री आशिष पारधे, तलाठी अमळगाव श्री पराग पाटील, तलाठी हेडावे श्री हर्षवर्धन मोरे , तलाठी मठ गव्हाण श्री धीरज देशमुख, तलाठी दोधवड श्री वाल्मीक पाटील, तलाठी खवशी श्री जितेंद्र पाटील यांनी कार्यवाही केली आहे.पुढील कार्यवाही सुरू असून ट्रॅकटर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

या आठवड्यात ही सलग दुसरी कार्यवाही असून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर चांगलाच वचक व धाक निर्माण झाला आहे.अशीच सतत कार्यवाही सुरू राहिल्यास बोरी,तापी,आणि पांझरेचे वस्त्रहरण थांबेल यात शंका नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button