Amalner

?️अमळनेर कट्टा..अमळनेर पोलीस ठाण्याचा प्र पदभार पो नि दिलीप भागवत यांच्या कडे..!वातावरण संदिग्ध..!कोणीही बोलण्यास तयार नाही..!

?️अमळनेर कट्टा..अमळनेर पोलीस ठाण्याचा प्र पदभार पो नि दिलीप भागवत यांच्या कडे..!वातावरण संदिग्ध..!कोणीही बोलण्यास तयार नाही..!

अमळनेर येथील पोलीस ठाण्याचा प्र पदभार पो नि दिलीप भागवत यांनी काही वेळा पूर्वी स्विकारला असून पो नि अंबादास मोरे हे रजेवर गेले आहेत म्हणून त्यांना पदभार सांभाळण्यास वरिष्ठांनी सांगितले असल्याचे त्यांनी भ्रमणध्वनी वरून ठोस प्रहारशी बोलताना सांगितले. या पुढे व नंतर वरिष्ठ जे आदेश देतील त्याप्रमाणे कार्य करेन असेही ते म्हणाले..!

या सर्व घडामोडीत शहरातच नव्हे तर तालुक्यात संदिग्ध वातावरण जनतेत निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बॅनर प्रकरण आणि अमळनेर पो नि आंबदास मोरे यांची बदली हे परस्पर संबधित विषय जोरदारपणे चर्चेत असून आता कालच मुख्याधिकारी संदीप गायकवाड आणि जैन समाज यांच्यातील बॅनर वाद जोरात पेटला होता पण काल या वादावर पडदा पडला अशी माहिती मिळाली असून समझोता झाला आहे अशीही माहिती मिळाली आहे. या अनुषंगाने आज पो नि दिलीप भागवत यांचा पदभार स्वीकारणं आणि पो नि अंबादास मोरे यांनी रजेवर जाणं (मुलाचं लग्न म्हणून रजा)ह्या गोष्टी गोंधळात टाकणाऱ्या आहेत.शक्यतो पो नि रजेवर गेले तर सहा पो नि कडे पदभार सोपविला जातो. पण अपवादात्मक रित्या अमळनेर पोलीस ठाण्याचा पदभार भागवतांनी स्वीकारला आहे.या सर्व गोष्टींमुळे शहरात संभ्रम निर्माण झाला असून लोकांमध्ये विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.या विषयावर बोलण्यास प्रत्येक टाळाटाळ करत असून जनतेला योग्य ती माहिती मिळणे आवश्यक आहे.असे लोकांचे म्हणणे आहे.

सध्या तरी अमळनेर पोलीस ठाण्याचा प्र पदभार पो नि दिलीप भागवत यांनी स्विकारला असल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button