Amalner

?️अमळनेर कट्टा..अमळनेर नगरपरिषदेचा मोह सोडवेना..!अतिरिक्त आयुक्त ची बढती मिळूनही “विद्ये”ला पडला “लक्ष्मी” चा मोह….!

?️अमळनेर कट्टा..अमळनेर नगरपरिषदेचा मोह सोडवेना..!अतिरिक्त आयुक्त ची बढती मिळूनही “विद्या”ला कशाचा पडला मोह…”लक्ष्मी” की “विद्या”..!

अमळनेर येथील तत्कालीन मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांची नुकतीच अतिरिक्त आयुक्त म्हणून बढती झाली आहे. कोरोना काळात सुरुवातीला अमळनेर च्या मुख्याधिकारी पदावर नियुक्त झालेल्या विद्या गायकवाड ह्या आता जळगांव जिल्ह्यात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्य करत आहेत. साधारणपणे अतिरीक्त आयुक्त म्हणजे additional commissioner ह्या पदाच्या व्यक्तीने मुख्याधिकारी पदाचा प्रभारी पदभार सांभाळणं तसं प्रोटोकॉल च्या आणि त्या पदाची गरिमा पाहता योग्य नाही. अतिरिक्त आयुक्त हे पद आयुक्त पदाच्या समकक्ष असून अश्या अतिरिक्त आयुक्त पदाच्या व्यक्ती ने मुख्याधिकारी पदाचा पदभार सांभाळणे हे जरा जास्तच विचित्र असून महाराष्ट्रात प्रथमच असा प्रकार होत असावा बहुतेक अशी संता बंता मध्ये चर्चा सुरू होती..!

deputy commissioner म्हणजे उपायुक्त ने असा देखील असा पदभार स्विकारणे शासकीय चौकटीत न बसण्यासारखे आहे.पण अमळनेर च्या तत्कालीन मुख्याधिकारी यांना अमळनेर काही सोडू वाटेना झालंय..!असे एकूण चित्र दिसत आहे. काय एव्हढ प्रेम असावं बर अमळनेर वर..! काही तरी कारण असल्या शिवाय “विद्या” जळगावी जाऊनही कोणत्या मोहात पडल्या आहेत ते काही समजत नाही..! लोक गोंधळात पडले आहेत की नेमकी बदली झाली आहे ना आणि अतिरिक्त आयुक्त झाले आहे ना की नुसतीच..!..? हं..!तर हे बोलणं संता आणि बंता मध्ये सुरू होतं आणि पिंट्या ने ऐकलं..! आता सर्व गावात चर्चा तर रंगणार च ना हो भाऊ..! What is this..? कोंबड्याच पीस..! अंह..! तूच माझी मुलगी आहे ना..?मग खुर्चीत तूच बैस..!

मधल्या काळात नवीन प्रभारी मुख्याधिकारी देशमुख यांनी पदभार स्विकारला होता..!त्यांच्या कामांची पध्दत पाहताच अनेकांना आपली नाव पाण्यात बुडताना दिसू लागली..!अन बॅनर प्रकरण उद्धभवल..!त्याचा योग्य पध्दतीने उपयोग करून घेत..लेकी बोले सुने लागे..! निशाणा साधून हमसे पंगा नहीं लेनेका चा इशारा देऊन टाकला आणि त्यांनी ते परतले..! आता पुन्हा सही करणारी खुर्ची खाली झाली मग काय ..!असेही आता शेवट शेवट तर आहे..न प च्या निवडणुकांचा बिगुल वाजणारच आहे..तो पर्यंत बेटा तूच परत पदभार संभाळ ना..! मुलगी मानले आहे ना..दादा..!तेव्हढीच चाल ढकल..! कसं हे .. नवीन अधिकारी..नवा भिडू..! नवा राज..!मग ऍडजस्ट मेंट,सेटलमेंट ला थोडा वेळ जातो ना …!मग काय मॅडम थोडं रिव्हर्स व्हा आमच्या साठी..!असा काही तरी प्रकार असावा अशी शहरात चर्चा सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button