Amalner

?️अमळनेर कट्टा…धक्कादायक..पटवारी कॉलनीतील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या…पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद..

?️अमळनेर कट्टा…पटवारी कॉलनीतील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या…पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद..

अमळनेर येथील विद्युतप्रभा कॉलनीतील रहिवासी तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.विद्युतप्रभा कॉलनीत वातव्यास असणारी पूजा राजेंद्र पाटील वय 27 ह्या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या बाबतीत सविस्तर माहिती अशी की पूजा ही शहापूर येथील शाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील यांची कन्या असून रात्री आई वडील व भावांशी गप्पा मारल्यानन्तर पूजा वरच्या मजल्यावर निघून गेली.या नंतर जेवण्यासाठी आवाज दिल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी वर जाऊन पाहिले असता दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून पाहिले असता पूजा छताला असलेल्या पंख्याला गळफास घेततल्या अवस्थेत आढळून आली.दरवाजा तोडून पुजाला खाली उतरविले व डॉ जोशी यांच्या कडे नेण्यात आले. परंतु तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.नंतर तिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

शहापूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले. तिच्या भाऊ मयूर पाटील याने दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.आत्महत्येचे कारण समजले नसून संपुर्ण कुटुंब शोकाकुल व धक्क्यात आहे.सदर तरुणी ही ग्राहक सेवा केंद्रात काम करत होती अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button