Amalner

?️अमळनेर कट्टा…विचारण्यास गेलेल्या एकावर विळ्याचा वार…!पोलिसांत गुन्हा दाखल…

?️अमळनेर कट्टा…विचारण्यास गेलेल्या एकावर विळ्याचा वार…!पोलिसांत गुन्हा दाखल…

अमळनेर येथे मोटरसायकल ने कट का मारला असे विचारल्यावरून दोन व्यक्तींनी एकाच्या मानेवर विळा मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की रोहिदास भिल व चंदू भिल रा दरेगाव ता अमळनेर हे दोघे दरेगावला मोटरसायकलने जात असताना दरेंगाव फाट्याजवळ राजेश जयवंत महाले उर्फ सोनल घोडेवाला याने त्यांना कट मारल्याने ते खाली पडून जखमी झाले. त्यांच्यावर तांबेपुरा येथील शहाबान पिंजारी यांनी उपचार केले. त्यांनतर गोलू व शहाबान दोघे सोनल घोडेवाल्याच्या घरी विचार पूस करायला गेले असता सोनल व त्याचा मित्र रवींद्र उर्फ गंप्या रामभाऊ जाधव यांनी तुमच्याशी बोलायचे आहे असे सांगून सोनल च्या प्रताप महाविद्यालयजवळील घोड्याच्या पत्र्याच्या शेड मध्ये तेथे गंप्या जाधव याने शहाबान च्या मानेवर डाव्या बाजूला विळा मारून गंभीर जखमी केले.शहाबान जीव घेऊन पळाला. तेथून पोलीस स्टेशनला आला. त्यांनतर त्याला उपचारासाठी डॉ अनिल शिंदे कडे दाखल करण्यात आले. गुलाब पिंजारी यांच्या फिर्यादीवरून गँप्या व सोनल घोडेवाला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय राकेशसिंग परदेशी करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button