Amalner

?️ अमळनेर कट्टा … विप्रो कंपनीचे अमळनेर तालुक्यासाठी कोविड १९ परिस्थिती भरीव योगदान

?️ अमळनेर कट्टा ..विप्रो कंपनीचे अमळनेर तालुक्यासाठी कोविड १९ परिस्थिती भरीव योगदान

अमळनेर : महाराष्ट्रात सध्या कोविड १९ ने थैमान घातले असतांना अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था तुटपुंजी बघण्यास मिळत आहे. करोना मुळे जीवाशी झुंज देण्याचे काम रुग्ण आणि संपूर्ण प्रशासन, डॉक्टर व त्यांची टीम स्वताच्या जीवाची बाजी लावून आहोरात्र सेवा करत आहे. ही वेळ म्हणजे प्रत्येकाने खांद्याला खांदा लावून काम करण्याची आहे. अश्या परिस्थिती काही व्यक्ती मात्र भान हरपले आहे. ही ती वेळ नाही किमान हे लक्षात ठेवून नागरिकांना सुविधा व जीव वाचण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. अमळनेर तालुक्यात मात्र सध्या लोकप्रतिनिधी एकमेकांची उणीधुनी काढून राहिली आहे. अश्यावेळी शहरातील दानशूर व्यक्ती हे प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी धावून आले. एकेकाळी अमळनेर शहरात इतर तालुक्यातून उपचार घेण्यासाठी नागरिक “प्रताप रुग्णालय” येथे येत असे. आज मात्र प्रताप रुग्णालयाची अवस्था ही बघितली तर बिल्डिंग पडकी झाली आहे. त्याचं अमळनेर शहरात विप्रो कंपनी ही जगात प्रसिद्ध आहे. खर तर लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि उद्योजक यांनी समन्वय साधून मागील वर्षापासून नियोजन करणे अपेक्षित होते. पण तसे काही घडले नाही. कठीण प्रसंगात आशेचा किरण शोधावा लागतो आणि आशेचा किरण म्हणजे विप्रो कंपनीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणे. अमळनेर शहरातील नागरिक जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे. अश्यावेळी अमळनेर तालुक्यातील श्री. मयुर बाळकृष्ण बागुल यांनी शहरातील विप्रो कंपनी सोबत पत्रव्यवहार केला आणि दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी फेसबुक वर पोस्ट केली. शहरातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी विप्रो कंपनीच्या व्यस्थापन यांच्या सोबत बोलून सहकार्य घ्यावे. दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी बेंगलोर येथील कार्यलयाला ई-मैल द्वारे पत्रव्यवहार करून अमळनेर तालुक्यातील कोविड १९ बाबत सविस्तर माहिती दिली. नुकतेच अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालय व इंदिरा गांधी कोविड सेंटर येथे विप्रो कंपनीच्या माध्यमातून ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देण्यात आले. यामुळे कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. विप्रो कंपनीचे मँनेजर जितेंद्र शर्मा व संजय टेनी यांच्या हस्ते ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स हे ग्रामीण रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पाटील व प्रांतधिकारी सीमा आहिरे मँडम उपस्थित होते. विप्रो कंपनीने अश्या संकटात नागरिकांसाठी केलेल्या भरीव कार्या बद्दल त्यांचे ऋणी आहे.
अमळनेर तालुक्यातील रुग्णांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण कार्य करत आहे. अनेक गंभीर रुग्ण देखील बरे झाले. त्यामुळे दोन्ही शासकीय रुग्णालय हे जीवनदायी केंद्र ठरत आहे. अमळनेर शहरातील विप्रो कंपनीचे व्यस्थापन यांनी तत्परतेने केल्या कार्यबद्दल त्यांचे अभिनंदन व मनपूर्वक आभार.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button