Amalner

?️ अमळनेर कट्टा … अमळनेरात आता मार्चपासून दर शनिवार बंदचा निर्णय प्रशासन व व्यापारी बांधवांच्या बैठकीत झाला निर्णय

?️ अमळनेर कट्टा … अमळनेरात आता मार्चपासून दर शनिवार बंदचा निर्णय प्रशासन व व्यापारी बांधवांच्या बैठकीत झाला निर्णय

अमळनेर : शहरात कोविड प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने अमळनेर उपविभागाच्या प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या दालनात आज दि 24 फेब्रुवारी रोजी व्यापारी प्रतिनिधींसोबत बैठक होऊन सदर बैठकीत 1 मार्च 2021 पासून दर शनिवारी अमळनेर येथील बाजारपेठ बंद ठेऊन जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर बैठकीत प्रांतधिकारी सीमा अहिरे,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत,न प चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी,अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल उपस्थित होते तर व्यापारी बांधवांच्या वतीने भरत ललवाणी,मुकुंद विसपुते,मनोज जीवनांनी,पूनम कोचर,बापू हिंदुजा,झामनदास सैनानी, लालचंद सैनानी,मनीष जोशी,प्रकाश जैन,विवेक भांडारकर,मकसूद बोहरी,बिपीन कोठारी,महेश कोठावदे,मामुभाई करमपूरवाला,कल्पेश बागरेचा, हितेश शाह,राजेश जीवनांनी यासह इतर व्यापारी बांधव उपस्थित होते.सदर बैठकीत सविस्तर चर्चा होऊन मास्क व शासकीय नियंमांचे पालन करावे,दुकानात एकावेळी 5 ग्राहकच हवे, कामगार व मालकांची संख्या मर्यादित असावी,नियम न पाळल्यास 5000/- दंड तथा एक वेळा दोनंदा दंड झाल्यानंतर संबधित दुकान जिल्हाधिकारी आदेश होईपर्यंत सिल करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले,मात्र सर्व व्यापारी व व्यावसायिक बांधवांनी प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य करावे आणि कारवाई टाळावी अशी विनंती करण्यात आली.
दरम्यान दर शनिवारी असलेल्या बंद मधून मेडिकल दुकाने,कृषी संबधित दुकाने,दूध विक्रेते आदींना वगळण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button