Amalner

?️ अमळनेर कट्टा…ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे-अमळनेर समता परीषदेचे तहसीलदारांना निवेदन…!

?️ अमळनेर कट्टा…ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे-अमळनेर समता परीषदेचे तहसीलदारांना निवेदन…!

अमळनेर : ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पुर्ततेअभावी स्थगित करण्यात आले आहे.आरक्षणा अभावी महानगरपालिका,नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रां पं यामधील ओबीसींच्या जागा कमी होत असुन यामुळे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात राष्ट्रीय अध्यक्ष नामदार छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशानुसार आंदोलनाला सुरुवात झालेली आहे.ओबीसीं चे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीचे निवेदन अमळनेर शहर व तालुका अ.भा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.*
*यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रा भिमराव महाजन,शहराध्यक्ष प्रताप पाटील,तालुकाध्यक्ष अमोल माळी,मा.उपनगराध्यक्ष अनिल महाजन,महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र महाजन,नगरसेवक देवीदास महाजन,धनंजय महाजन,साखरलाल महाजन,माळी समाज सुधारणा मंडळ(महाराष्ट्र,मध्यप्रदेश, गुजरात)चे सचिव मनोहर महाजन,मेडिकल असोसिएशन चे प्रविण महाजन,पंकज चौधरी,विनायक सुर्यवंशी,प्रविण माळी,गणेश धोबी,महेंद्र सुतार अतुल महाजन,सतिष कासार,सुनिल महाजन,राहुल सोनार आदि उपस्थित होते.*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button