Amalner

?️ अमळनेर कट्टा… लेकीच्या लग्नाची आस लावताच दुभंगलेल्या संसाराची गाडी रुळावर ! अमळनेरच्या महिला अन्याय विरोधी समितीचे यश!

?️ अमळनेर कट्टा… लेकीच्या लग्नाची आस लावताच दुभंगलेल्या संसाराची गाडी रुळावर !
अमळनेरच्या महिला अन्याय विरोधी समितीचे यश!

अमळनेर : रोजगारा निमित्त अंकलेश्वर येथे स्थायिक , छोटेसे घर, गरिबीची परिस्थिती व कौटुंबिक किरकोळ कारणाने संसारात वितुष्ट येऊन अमळनेर येथील शिल्पा व अमर एकदुसऱ्या पासून लांब झाले होते!
परिस्थिती व किरकोळ वादातून पंधरा वर्षे दुरावलेले शिल्पा व अमर ला सूनयना नामक सोळा वर्षीय गोड कन्या रत्न आहे. शिल्पा गेली पंधरा वर्ष अमळनेर येथे माहेरी होती. पत्नी व मुलीच्या प्रेमापोटी अमर समाज पंच व अनेकांची मदत घेत पुन्हा संसार सुरळीत व्हावा म्हणून प्रयत्न करीत होता.. रोजगाराचे निमित्ताने अंकलेश्वर येथे स्थायिक अमर साठी अनेकांनी प्रयत्न देखील केले परंतु शिल्पा व तिचे माता पिता मात्र तयार होत नहोते. तालुक्यातीलच मूळ रहिवाशी असलेल्या अमरच्या कुटूंबियांनी अमळनेरच्या महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार यांना ही घटना सांगून विनंती करताच त्यांनी व समिती सदस्यांनी या प्रकरणी शास्त्रीय समुपदेशन करून दोघांना पुन्हा एकत्र आणण्याची किमया करून दाखवीली!
मुलगी सूनयना काही काळात लग्नाची होईल, तुम्ही व्याहीबाही व्हाल, संसारातील वाद निपटत राहतील पण लेकीच्या सुखाचे काय? अशी भावनिक साद घालत दोन्ही परिवारातील समज गैरसमज दूर करीत एकोपा निर्माण करण्यात समितीच्या सदस्यांना यश आले.
आज तब्बल 15 वर्षा नंतर अमळनेर येथून शिल्पा अंकलेश्वर येथे अमर कडे नांदावयास रवाना झाली.. तब्बल पंधरा वर्षा नंतर जन्मदाता भेटल्याचा आनंद सुनयनाच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू सांगत असल्याचे पाहून उपस्थित लोकांचे मन हेलावले.
मान्यवर साक्षीदार यांचे समवेत लेखी मुचलका व चांगले वर्तणुकीचा लेखाजोखा केल्या नंतर दोन्ही परिवारात एकोपा निर्माण करणारे धनंजय सोनार, मंगलाताई विसपुते, अनिल एकनाथ चौधरी, निशा विसपुते, शुभांगी सोनार, अनिल हिम्मत पाटील यांनी कौशल्य पणास लावले. या सर्वांचे दोन्ही कुटुंबियांनी आभार व्यक्त केले.
गेली 25 वर्ष कौटुंबिक वादात समुपदेशन करणाऱ्या महिला अन्याय विरोधी समितीच्या या कार्याबद्दल समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे!
——————————–
मा संपादक/ प्रतिनिधी
यांसी
महोदय,
आपल्या वाचकप्रिय वृत्तपत्रात/ पोर्टल वर वरील वृत्त ठळक प्रसिध्द करून सामाजिक कामास बळ द्यावे, ही विनंती.
-धनंजय सोनार
महिला अन्याय विरोधी समिती , अमळनेर ४२५४०१
(जळगाव)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button