Amalner

?️ अमळनेर कट्टा… धार ते खापरखेडा रस्त्याच्या खडीकरण भूमिपूजनाचा शुभारंभ.

?️ अमळनेर कट्टा… धार ते खापरखेडा रस्त्याच्या खडीकरण भूमिपूजनाचा शुभारंभ.

अमळनेर : तालुक्यातील धार येथून खापरखेडा जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमीपुजनाचा शुभारंभ आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या सेस निधीतून हे काम सुरू करण्यात आले असून वाहनांना बोरी काठावर व बोरीकाठ वरील गावांना इकडे मारवड भागात येण्यासाठी मधला मार्ग म्हणून पर्यायी रस्ता मिळणार आहे. मारवड येण्यासाठी अथवा बोरीकाठ वरील गावांना जाण्यासाठी यापूर्वी अमळनेर मार्गाने जावे लागत असे आता हा मोठा फेरा वाचणार आहे.

यावेळी बाजार समितीचे माजी संचालक व माजी सरपंच एच एस पाटील, एस टी कामगार नेते एल टी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, धारचे सरपंच दगडू सैंदाने, उपसरपंच शशिकांत पाटील, अलीम मुजावर, सुरेश पाटील, सुभाष पाटील, संजय पाटील, भानुदास पाटील, रज्जाक शहा, यशवंत पाटील, रमेश पाटील, बाबू पेंटर, सुरेश पाटील, दीपक पाटील, गणेश पाटील, दिलीप पाटील, सिद्धार्थ साळुंखे, भरत पाटील, प्रकाश पाटील, वासुदेव पाटील, जुबेर मुजावर, वैशोद्दीन मुजावर, सागर पाटील, अरुण पाटील आदी नागरिक उपस्थित होते.

?️ अमळनेर कट्टा... धार ते खापरखेडा रस्त्याच्या खडीकरण भूमिपूजनाचा शुभारंभ.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button