Amalner

?️ अमळनेर कट्टा…. तापी खोऱ्यातील पाडळसे येथे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते जलपूजन….

?️ अमळनेर कट्टा…. तापी खोऱ्यातील पाडळसे येथे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते जलपूजन….

अमळनेर : जळगांव जिल्हा अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प हा तापी खोरे अंतर्गत आहे.सदर प्रकल्प पाडळसे गावाच्या वरील बाजूस तापी नदीवर बांधकामाधीन आहे.निम्न तापी प्रकल्पाचे सांडवा बांधकाम १३९.२४ मीटर पर्यंत झाल्याने १२.९७ दसलक्ष घनमीटर जलसाठा सन २०१४ अखेरीस झालेला असुन २२ आॅगस्ट २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार यांचे शुभहस्ते जलपुजन करण्यात आले होते.
काही दिवसापुर्वी विदर्भात झालेल्या प्रचंड पर्जन्यमानामुळे पुर्णा नदीला मोठा पुर आल्याने तापी पुर्णा संगमामुळे हतनुर धरणाचा जलसाठा वाढल्यामुळे धरणाचे ८ दरवाजे उघडून २३ हजार क्युसेस पाणी तापी नदीत सोडल्याने जळोद डोहासह निम्न तापी प्रकल्पाच्या १३९.२४ तलांकापर्यंत जलसाठा निर्माण होऊन अमळनेर व धरणगांव या शहरांसह नदीकाठावरील गावांची पशुधनासह पिण्याच्या पाण्याची समस्या दुर झालेली आहे.
सदर प्रकल्पातील जलसाठ्याचे जलपुजन करतांना जळगांव जिल्हा नियोजन समिती सदस्य भागवत पाटील,विकास पाटील सोबत मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,अमळनेरनगरपरिषदेचे आरोग्य सभापती नगरसेवक श्याम पाटील व सोनु पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button