Amalner

?️ अमळनेर कट्टा… शेतकऱ्यांना पुरेश्या खत पुरवठ्यासाठी अमळनेरात खतांचा रॅक लावा-आ.अनिल पाटील

?️ अमळनेर कट्टा… शेतकऱ्यांना पुरेश्या खत पुरवठ्यासाठी अमळनेरात खतांचा रॅक लावा-आ.अनिल पाटील
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व ऑनलाइन बैठकीत धरला आग्रह,बोगस बियाणे व खतांची विक्री रोखण्याची मागणी
अमळनेर : जळगाव जिल्ह्यात विस्ताराच्या दृष्टीने विचार केल्यास अमळनेर तालुका नंबर दोन वर असून याठिकाणी जवळपास 21 हजार टन खतांची आवश्यकता असते यासाठी अमळनेरात खतांचा रॅक लावला जावा अशी आग्रही मागणी आमदार अनिल पाटील यांनी जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठकीत केली.पालकमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली.
याव्यतिरिक्त केंद्र शासनाने खतांच्या किमती वाढविल्याने सर्व खासदार व आमदारांनी केंद्राकडे किमती कमी करण्यासाठी आग्रह धरावा अशी मागणीही आमदारांनी यावेळी केली. जळगाव जिल्ह्याची खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक दि 7 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन घेण्यात आली.सदर बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक,सर्व विभागीय व तालुका कृषी अधिकारी, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जि प चे सर्व कृषी अधिकारी व कृषी सभापती सहभागी झाले होते.आमदार अनिल पाटील यांनी यावेळी बोलताना जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात खतांची मोठी मागणी असल्याने वाटपात कोणतीही गरबड होऊ नये यासाठी जिल्हाधिकारीनी स्वतः नियंत्रण ठेवावे,अमळनेर तालुक्यात साधारणपणे 21 हजार मॅट्रिक टन खतांची आवश्यकता आहे,मागील वर्षी अमळनेरात रॅक ची व्यवस्था असून देखील रॅक लावला गेला नाही,आणि खतांचे ट्रक विदर्भात अडकल्याने पुरेश्या खतांचा पुरवठा अमळनेरात होऊ शकला नाही,यासाठी यंदा जळगाव प्रमाणेच अमळनेरात देखील खतांचा रॅक लावावा अशी आग्रही मागणी आमदारांनी केली,तसेच बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीवर अंकुश लावला गेला पाहिजे,केंद्र सरकारने खतांच्या किमती 40 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे,त्याकिमती कमी कराव्यात यासाठी राज्य शासनानेही प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार पाटील यांनी केली,याशिवाय कांदा चाळीचा इष्टांक वाढविण्याची मागणी देखील आमदारांनी केली.दरम्यान अमळनेर तालुक्यात यंदा खत पुरवठा पुरेसा राहून बोगस बियाणे व खतेही राहणार नाहीत असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button