Amalner

?️ अमळनेर कट्टा…अमळनेर येथील पोलिस वसाहतीच्या नित्कृष्ट कामाची तात्काळ चौकशी करावी….अ.भा.पो.ह.संघटना अमळनेर तालुका अध्यक्ष रविंद्र भगवान पाटील यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

?️ अमळनेर कट्टा…अमळनेर येथील पोलिस वसाहतीच्या नित्कृष्ट कामाची तात्काळ चौकशी करावी….अ.भा.पो.ह.संघटना अमळनेर तालुका अध्यक्ष रविंद्र भगवान पाटील यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…
अमळनेर : अवघ्या चार महिन्यांपूर्वी उदघाटन झालेल्या पोलीस वसाहतीतील एका खोलीच्या छताचे प्लास्टर खाली कोसळले. ही घटना १ रोजी दुपारी चारला घडली. यात दोन्ही जुळे बालक बालबाल बचावली असून या कामाची चौकशी करावी अशी मागणी अ.भा.पो.ह.संघटना अमळनेर तालुका अध्यक्ष रविंद्र भगवान पाटील यांनी केली आहे.
अवघ्या काही महिन्यांपूर्वी शहरातील ढेकू रोडवरील नवीन पोलीस वसाहतीचे उदघाटन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस कर्मचारी तेथे राहायला गेले होते. १ मे रोजी दुपारी “बोरी” इमारतीत खोली नंबर तीनमध्ये राहणारे पोलीस कर्मचारी सचिन भागवत पाटील हे बाहेर गेलेले होते. त्यांच्या पत्नीने आपली साडेतीन वर्षांची जुळी मुले पंख्याखाली गादी टाकून झोपवले होते. अचानक छताच्या प्लास्टरचा तुकडा खाली पडला आणि लहान बाळांची आई सावध झाली. तिने क्षणाचाही विलंब न लावता, तत्काळ गादी ओढून बाजूला नेली. तेवढ्यात काही क्षणातच प्लास्टरचा मोठा भाग खाली कोसळला. सुदैवाने दोन्ही बाळ वाचले. काही दिवसातच इमारतीचे छताचे भाग कोसळणे म्हणजे बांधकामच्या गुणवत्तेबद्दल संशय निर्माण होण्यासारखे झाले आहे. या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अ. भा.पो ह संघटना अमळनेर तालुका अध्यक्ष रविंद्र भगवान पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मेलद्वारे निवेदन पाठवत केली आहे.
नित्कृष्ट कामाचे श्रेय कोण घेणार ???
पोलिस वसाहत मंजूर होवून त्याचे हस्तांतरण होण्याच्या प्रक्रियेत आमदार बदलले आहेत. त्यामुळे या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीत करण्यात आला होता. आता मात्र ह्या नित्कृष्ट कामाचे श्रेय कोण घेणार अशी विचारणा होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button