Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर शहरातील अयोध्या नगरात बंद घरातच पती पत्नीचा मृत्यू

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर शहरातील अयोध्या नगरात बंद घरातच पती पत्नीचा मृत्यू

योगेश पवार अमळनेर

अमळनेर : शहरातील अयोध्या नगर मधील वृद्ध पती व पत्नीचा २४ रोजी बंद घरातच मृत्यू झाल्याची घटना घडली .त्यांचा मृत्यू कशाने झाला हे मात्र समजू शकले नाही म्हणून कोरोना संशयित म्हणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दाजमल नागो देवरे वय ८५ आणि निलाबाई दाजमल देवरे वय ७५ अशी मयतांची नावे आहेत. दाजमल देवरे हे रेल्वेतून निवृत्त झाले होते, दोघे पती व पत्नी एकटेच घरात राहत होते,त्यांची तिन्ही मुले रेल्वेत नोकरीस आहेत. एक धरणगाव ,एक शिंदखेडा ,आणि अमळनेर ला तिन्ही विभक्त राहत होते. वृद्ध पती आणि पत्नीचे यांची उपजीविका त्यांच्या पेन्शन मधून सुरू होती. एक मेसवाला त्यांना दररोज जेवणाचा डबा आणून देत होता. २२ रोजी डबा देणारा आला आणि त्यांनी घरातूनच नकार दिला घर तीन दिवसांपासून बंद असल्याने शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी खिडकीच्या फटीतून पाहीले असता त्यांना ते झोपलेले आढळून आले यामुळे त्यांनी गावातील मुलांना कळविले,त्यानंतर शेजारी सुनील गव्हाणे , राजेंद्र यादव , बाळू माने नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत घर उघडल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले,त्यावेळी दोन्ही पती व पत्नी मयत झालेले आढळून आले,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत , हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे , प्रमोद पाटील पोलिसांनी भेट दिली.दरम्यान त्यांचा मृत्यू आजाराने झाला की इतर कारणाने हे मात्र समजू शकले नाही कोरोना संशयित म्हणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button