Amalner

?️ अमळनेर कट्टा… व्यापारी गाळ्यांचा लिलाव स्थगित झाला तरी अनामत काढू नका माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार यांचे अनामत रक्कम धारकांना आवाहन

?️ अमळनेर कट्टा… व्यापारी गाळ्यांचा लिलाव स्थगित झाला तरी अनामत काढू नका माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार यांचे अनामत रक्कम धारकांना आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नगरपलिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव स्थगित झाला असला तरी यात सहभागी झालेल्यांनी आपली अनामत रक्कम विड्रॉल करून नये. कारण यातील सहभागींची संख्या कमी झाल्यास ५० लोकांवर नगरपालिका लिलाव करून आपल्या हितचिंतकांच्या घशात गाळे अडकण्याची शक्यता आहे. म्हणून कोणीही आपली अनामत रक्कम विड्रॉल करून नये, असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार यांनी केले आहे.
माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नगरपालिकेने टीपी आरक्षित फायनल प्लाट नं.७७-७८ या जागेवर बीओटी तत्त्वार व्यापारी संकुल बांधले आहे. यातील २६ गाळ्यांचा सोमवारी जाहीर लिलाव होणार होता. यासाठी २०० लोकांकडून नगरपालिकेने ५० हजार रुपयांप्रमाणे १ कोटी रुपये अनामत रक्कम गोळा केली आहे. पंरतु जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा लिलाव तुर्त रद्द केला आहे. त्यामुळे या लिलावास सहभागी असलेल्यांना त्यांची ५० हजार रुपयांची अनामत रक्क काढून घेण्याचे सल्ले दिले जात आहे. परंतु यातील एकानेही ही रक्कम काढू नये कारण आज ना उद्या त्याचे लिलाव निश्चितच होतील. परंतु यातील अनेकांनी आपली अनामत रक्कम काढून घेतल्यास ते या प्रक्रियेतून बाहरे पडतील आणि नगरपालिकेला जे हवे आहेत त्या ५० लोकांना राहू देत लिलाव प्रक्रिया पार पाडू शकता. यात त्यांचे हितचिंतक, राजकारणी आणि अधिकारी असू शकता. त्यांना कमी किमतीत दे गाळे मिळू ही शकतात. त्यामुळे नगरपालिकेला कोणती ही संधी न देता सर्वांनीच आपली अनामत रक्कम विड्रॉल न करता नगरपालिकेकडे राहू द्यावे, जेणेकरून सर्वांना कोरोनाच्या सावटानंतर लिलावात सहभागी होऊन आपले गाळे घेण्याचे स्वप्न साकार करता येईल, असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष कासार यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button