Amalner

?️ अमळनेर कट्टा …. स्वतंत्र मायक्रोफिन कंपनीकडून बोहरा व नांदेड येथील ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर वाटप…

?️ अमळनेर कट्टा …. स्वतंत्र मायक्रोफिन कंपनीकडून बोहरा व नांदेड येथील ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर वाटप…

अमळनेर : तालुक्यातील बोहरा व धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे स्वतंत्र मायक्रोफिन कंपनीकडून ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
स्वतंत्र मायक्रो फायनान्स कंपनीकडून सामाजिक बांधिलकी जपत बोहरा व नांदेड येथील ग्रामस्थांना एकूण ४०० मास्क व ४०० सॅनिटायझर बॉटल वाटप करण्यात आल्या. यावेळी गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य अधिकारी, तसेच स्वतंत्र मायक्रो फायनान्सचे विभाग प्रमुख अंकुश खंडारे, शाखाधिकारी राहुल गिलबिले, कर्मचारी संदीप भालेराव, कृष्णा माळी आदी उपस्थित होते. मागील लॉकडाऊन काळात ही पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले होते. यावेळी सदर ग्रामस्थांनी कंपनीचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button