Amalner

?️ अमळनेर कट्टा… कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे वितरण

?️ अमळनेर कट्टा… कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे वितरण
अमळनेर : तालुक्यात कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे वितरण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले
यावेळी कृषी उपविभागीय अधिकारी दादाराव जाधवराव, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, कृषी अधिकारी वाय ए बोरसे,मंडळ कृषी अधिकारी मयूर कचरे, कृषी सहाय्यक दीपक चौधरी, आर एच पवार, डी एम बोरसे, आदी यावेळी उपस्थित होते. तर एल.टी पाटील, जितेंद्र राजपूत, संजय पुनाजी पाटील, दिपक पाटील, गजानन पाटील, गुणवंत पाटील, डाॅ भुपेंद्र पाटील सचिन बेहरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते राहुल रामभाऊ संदानशिव यांना रोटाव्हेटर अमळनेर, बारकू देविदास पाटील कापूस थ्रेडर, राजकोरबाई रामसिंग पाटील अमळनेर रोटाव्हेटर, स्वामी समर्थ शेतकरी गट हिंगोणे बु ट्रॅक्टर व कृषी औजारे बँक, प्रदीप अमृत पाटील जानवे रोटाव्हेटर, आदींना वितरण करण्यात आले.
ही योजना केंद्रपुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.
या योजने मध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते.
उदा. ट्रॅक्टर, पॉवर टीलर,
स्वयंचलित औजारे उदा.रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)
ट्रॅक्टर चलीत औजारे उदा. रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र(थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर,
काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे उदा.मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर,
अशा प्रकारच्या औजारांच्या खरेदी साठी शेतकरी यांना अनुदान दिले जाते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button