Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेरात पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन.

?️ अमळनेर कट्टा… अमळनेरात पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन.

अमळनेर : आज दिनांक ७ जून 2019 रोजी जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड संदीप पाटील यांच्या आदेशाने, अमळनेर तालुका व शहर व युवक काँग्रेस कमिटीतर्फे डिझेल पेट्रोल व गॅस दरवाढीविरोधात आंदोलन छेडले गेले.
अमळनेर शहरातील दोन पेट्रोल पंपांवर आंदोलन करत, केंद्र सरकार विरोधी घोषणा दिल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात भाजपा केंद्र सरकारचा धिक्कार केला. तसेच पेट्रोल डिझेल भाव वाढीमुळे वाहने चालवणे, वापरणे परवडत नसल्याने, आंदोलनकर्त्यांनी दोन चाकी व चार चाकी वाहने एका पेट्रोल पंपापासुन दुसऱ्या पेट्रोल पंपावर ढकलत नेले, व जनसामान्यांचे आंदोलनासंदर्भात लक्ष वेधून घेतले. त्यात दोन-तीन कार्यकर्त्यांनी छोटेखानी भाषणे देखील केलीत.याप्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री गोकुळ बोरसे , शहराध्यक्ष मनोज पाटील,महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना ताई वाघ,किसान काँग्रसचे सुरेश दादा पाटील , बी.के.सूर्यवंशी,सोशल मिडिया प्रदेश प्रतिनिधी तुषार संदानशिव, हर्षल पाटील, रज्जाक शेख, तौसिफ तेली, सईद तेली, युवक अध्यक्ष श्री महेश पाटील, शहर कार्याध्यक्ष कुणाल चौधरी.
तसेच पेट्रोल डिझेल, एल पी जी गॅस चे भाव वाढल्यामुळे समाजातील सर्वसामान्य लोकांच्या व्यथा पाहून अमळनेरचे उच्च विद्याविभूषित प्राध्यापक,डॉक्टर,वकील आदींनी आंदोलनाला पाठीबा दिला . यावेळेस प्रा. किरण पाटील, प्रा. स्वप्निल पवार, प्रा. दीपक पवार, प्रा.पंकज तायडे, प्रा.गोपाल पाटील, प्रा.विलास पाटील,प्रा. योगेश वाणी, प्रा.अमोल पाटील, डाॅ रवींद्र पाटील, डॉ दिपक पाटील, डाॅ आत्माराम पाटील, अॅड उमेश पाटील, अॅड गिरीश पाटील आदींनी आंदोलनात मनापासून सहभाग घेतला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button