Amalner

?️ अमळनेर कट्टा…अमळनेरच्या डॉ.विशाल राजेंद्र कुमार शेलकर एम बी बी एस उत्तीर्ण; एकाच घरात नांदताय ८ डॉक्टर

?️ अमळनेर कट्टा…अमळनेरच्या डॉ.विशाल राजेंद्र कुमार शेलकर एम बी बी एस उत्तीर्ण; एकाच घरात नांदताय ८ डॉक्टर

अमळनेर : आपल्या घरात एखादी व्यक्ती डॉक्टर झाली की आपली कॉलर ताठ होते. पण एकाच घरातील ८ सदस्य डॉक्टर असतील तर? आश्चर्यचकीत झाला असाल ना! पण हे सत्य आहे. अमळनेरमध्ये एक असं कुटुंब आहे की, ज्या कुटुंबातील एक दोन नव्हे तब्बल ८ जण डॉक्टर आहेत. येथील नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर यांचा नातू व अमळनेर नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र कुमार रामदास शेलकर तथा सौ लता शेलकर यांच्या सुपुत्र डॉ विशाल राजेंद्रकुमार शेलकर हा नुकताच पार पडलेल्या एम बी बी एस च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.डॉ विशाल शेलकर चा मोठा भाऊ डॉ.तुषार राजेंद्रकुमार शेलकर हा देखील मागील वर्षी एम बी बीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता.श्री रामदास दौलत शेलकर यांचे नातू मुलीचे मुलं व न प कर्मचारी संतोष महाजन यांचे चिरंजीव डॉ.उल्पेश संतोष महाजन DGO, DNB (स्त्री रोग तज्ञ) तर दुसरा नातू डॉ.पंकज संतोष महाजन M.D मेडिसिन व तिसरा नातू डॉ.मयुर महाजन MBBS, DNB Anastasio (भूलतज्ञ)असून दोन नातसुना डॉ मीनाक्षी उपलेश महाजन B.D.S व डॉ.हर्षदा महाजन B D.S आहेत.या सर्व डॉक्टर परिवाराचे विशेष करून या परिवाराचे आधारवड तथा मार्गदर्शक माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर या यांचे सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button