Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर तालुक्यास मिळाल्या 2 रूग्णवाहिका; आमदारांच्याहस्ते लोकार्पण !

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर तालुक्यास मिळाल्या 2 रूग्णवाहिका; आमदारांच्याहस्ते लोकार्पण !

अमळनेर : कोविडच्या आपत्तीमुळे जिल्ह्यातील सर्व आमदारांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यामार्फत राज्य शासनाकडे नवीन अद्ययावत रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याच्या पूर्ततेचा पहिला टप्पा पार पडला असून आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याहस्ते ग्रामीण रुग्णालय, अमळनेर व प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडळ येथील रूग्णवाहिकांचे श्रीफळ वाहुन व फित कापून लोकार्पण करण्यात आले.

अमळनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडळ येथे असणार्‍या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने आमदार अनिल पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्फत राज्य शासनाकडे अमळनेर तालुक्यासाठी रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात 2 रूग्णवाहिका तालुक्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. तर उर्वरित रूग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.

या रूग्णवाहिकांचे आज ग्रामीण रूग्णालयात लोकार्पण करण्यात आले. आमदार अनिल पाटील यांनी फित कापून या रूग्णवाहिका शासकीय सेवेसाठी अर्पीत केल्या.

आमदार अनिल पाटील यांनी आज ग्रामीण रूग्णालयात या रूग्णवाहिकांचे लोकार्पण केले. यात चालकांना चाव्या देऊन अ‍ॅब्युलन्सेसची फित कापुन श्रीफळ वाहण्यात आले. याप्रसंगी रूग्णवाहिका चालकांना प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ.अनिल पाटील म्हणाले की, कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यावश्यक असते. यात बर्‍याच रूग्णांना अँब्युलन्सची आवश्यकता पडत असते. आता उर्वरित अ‍ॅब्युलन्सेसही लवकरच मिळणार आहेत. तालुक्यातील रूग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचेही आ.अनिल पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मांडळ ता.अमळनेर रुग्णवाहिका मिळाल्याने त्या – त्या परिसरातील रुग्णसाठी दिलासा मिळणार आहे.

याप्रसंगी पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाउपाध्यक्ष गौरव पाटील, डाॅ दिलिप पाटोळे अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, डाॅ गिरीश गोसावी तालुका आरोग्य अधिकारी, डाॅ प्रकाश ताळे अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, डाॅ विलास महाजन वैद्यकीय अधिकारी न.प. अमळनेर, डाॅ जी.एम.पाटील वैद्यकीय अधिकारी, डाॅ सागर पाटील वैद्यकीय अधिकारी मांडळ, डाॅ राजेंद्र शेलकर वैद्यकीय अधिकारी न.प., हरीष चौधरी, चालक भुषण पाटील, प्रदीप पाटील, राहुल गोत्राळ, योगेश पाटील, पप्पुभैय्या कलोसे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button