Amalner

?️ अमळनेर कट्टा…अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर अमळनेर पोलिसांची कारवाई…

?️ अमळनेर कट्टा…अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर अमळनेर पोलिसांची कारवाई…

अमळनेर तालुक्यात सातत्याने अवैध वाळू वाहतूक होत असते.शेकडो वाळू माफिया तालुक्यात कार्यरत आहेत. अमळनेर तालुक्याच्या चारही बाजूंनी नदी पात्र असल्याने कमी वेळात श्रीमंत होण्याचा बिन भांडवली धंदा म्हणजे अवैध वाळू उपसा करून अव्वा च्या सव्वा किमतीला विकणे हा सरळ सरळ गोरख धंदा वाळू माफियांनी अंगिकरला आहे.प्रशासन सातत्याने वाळू माफियांवर कार्यवाही करत आहे.

जवखेडा ते वावडे दरम्यान अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकटर वर पोलिसांनी कार्यवाही करत गुन्हा दाखल केला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना जवखेडे ते वावडे रोड वरून अवैध गोण खनिजाची चोरी सुरु असल्याली माहिती मिळाली त्या नुसार सहा .फौजदार संजय पाटील ,पो.कॉ.मोहन जावरे ,हिरालाल पाटील ,भूषण बाविस्कर ,चालक मधुकर पाटील यांना कारवाईचे आदेश दिले असता त्यांना जवखडे ते वावडे रोडवर जवखेडे शाळा जवळ एक टॅक्टर ट्राली मधे वाळू भरून जाताना आढळून आले. त्यात असलेली वाळू व ट्रॅक्टर याची अंदाजे किंमत 350000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.चालक कपिल भिकन कोळी वय 20 राह .माडळ ता .अमळनेर यास या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पो.ना .कैलास शिंदे तपास करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button