Amalner

?️ अमळनेर कट्टा… अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमळनेर शाखेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न ..

?️ अमळनेर कट्टा… अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमळनेर शाखेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न ..
अमळनेर : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रक्तदान हा महत्वाचा विषय बनला आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तपेढींमधील रक्तसाठा कमी पडू लागला आहे. तसेच आगामी दिवसात अजून मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होईल या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमळनेर शाखेतर्फे आज दि.३ मे २०२१, सोमवार रोजी अभाविप कार्यालय याठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली. यावेळी रक्तमित्र मनोज शिंगाणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पराग पाटील,रा.स्व.संघाचे कार्यवाह हितेशभाई शहा,सिनेट सदस्य दिनेश नाईक,अभाविप शहरमंत्री केशव पाटील यांची उपस्थिती होती. याप्रसंगी अभाविप,
रा.स्व.संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
रक्तसंकलनासाठी जळगाव येथील स्व. माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे पथक उपस्थित होते.शिबीरात कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.सामान्य रूग्णास आवश्यक तेव्हा रक्त उपलब्ध व्हावे या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा एसएफएस प्रमुख निलेश पवार, जिल्हा विद्यार्थिनी प्रमुख प्रगती काळे, कार्यक्रम प्रमुख देवयानी भावसार, पवन सातपुते, प्रितेश पाटील, रितल राजपूत, नरेंद्र देसले,अक्षय राठोड,अमोल पाटील यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button