Amalner

?️ अमळनेर कट्टा..पोलिसांत तक्रार केली म्हणून महिलेचा विनयभंग..!

?️ अमळनेर कट्टा..पोलिसांत तक्रार केली म्हणून महिलेचा विनयभंग..!

अमळनेर मारवाड पोलिस ठाण्यात तक्रार केली म्हणून अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे सदर महिला गावात एकटी राहते. 7 जून 2021 रोजी सकाळी 6 वाजता चूल पेटवण्यासाठी घरामागे लाकडे घेण्यासाठी गेली असताना गावातील रमेश शिरसाठ याने हात धरून माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार का केली? तुझा नवरा येथे राहत नाही, मीच तुझा नवरा आहे ,असे बोलून जर तू ऐकून घेतले नाही तर तुझी बदनामी करेल, अशी धमकी देत विनयभंग केला.अशी तक्रार महिलेने दिलेल्या फिर्यादिवरून मारवड पोलिसात भादंवि कलम ३५४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास सहाय्यक फौजदार बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button